पिंपरी- साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन व ऑल इंडिया वुमेन राइट्स असोशियन यांच्यातर्फे वर्ल्ड बेस्ट सिस्टर अवॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ईस्ट कोर्ट फिनिक्स मॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींना इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार 2024 देण्यात आला. यामध्ये सुधा प्रशांत ढवळे यांना क्रीडा महर्षी पुरस्काराने गौरवण्यात आले सुधा ढवळे ह्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिट स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज तळेगांव- चिखली येथे क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. सुरज गिरी, डॉ. स्वप्निल चौधरी यांच्या हस्ते सुधा ढवळे यांचा भव्य असा सत्कार शाळेच्या वतीने संचालक हरिभक्त पारायण राजू महाराज ढोरे, संचालक डॉक्टर स्वाती मुळे ,मुख्याध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार, समन्वयक मयुरी मुळूक यांनी केला व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी शाळेच्या शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सुधा ढवळे या एक चांगल्या कबड्डीपटू असून त्यांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत व अनेक कबड्डी स्पर्धेचे देखील आयोजन केलेले आहे.
New Delhi
mist
27.1
°
C
27.1
°
27.1
°
89 %
1.5kmh
40 %
Fri
34
°
Sat
38
°
Sun
38
°
Mon
38
°
Tue
38
°