पुणे-डिवाइन जैन ग्रुप व आदिनाथ जैन टेम्पल ट्रस्ट यांच्या वतीने पुणे रेल्वे स्थानकावर कार्यरत सर्व स्वच्छता कर्मचारी, कुली, प्रवासी आणि इतर कष्टकरी लोकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट्स वाटप करण्यात आले.
ही मदत केवळ शारीरिक गरज भागविण्यासाठी नाही, तर या कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे कौतुक करण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. थंडीच्या कठीण दिवसांमध्ये गरजू व्यक्तींना गरजेनुसार मदत पुरवणे ही माणुसकीची खरी ओळख आहे.डिवाइन जैन ग्रुपच्या या उपक्रमामुळे स्वच्छता कर्मचारी व हमाल यांना केवळ उबदारतेचा आधार मिळणार नाही, तर समाजाने त्यांच्या कार्याचे महत्त्व ओळखले आहे, याची जाणीवही राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जैन समाजातील धर्म गुरु युगप्रधान आचार्यसम पंन्यासप्रवर ,श्री चन्द्रशेखरविजयजी म.सा. चे शिष्यरत्न,प.पू.पंन्यास श्री राजरक्षितविजयजी म.सा.,प.पू.पंन्यास श्री नयरक्षितविजयजी म.सा.यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला.
या प्रसंगी पुणे रेल्वे स्टेशनचे डायरेक्टर मदनलाल मीना (IRTS), आदिनाथ जैन टेम्पल ट्रस्ट चे श्री. हितेश शहा, डिवाइन जैन ग्रुपचे अध्यक्ष श्री. संकेत शहा, चेतन जैन, तेजपाल ओसवाल आणि स्वयंसेवकांनी आवर्जून सहभाग घेतला.डिवाइन जैन ग्रुपने नेहमीच समाजाच्या सेवेसाठी योगदान दिले असून, या रेल्वे स्थानकाच्या उपक्रमामुळे त्यांनी पुन्हा एकदा आपली समाजसेवेची बांधिलकी सिद्ध केली आहे.