36.2 C
New Delhi
Friday, July 11, 2025
Homeमहाराष्ट्रस्व.सी.आर. रंगनाथन् कर्णबधीर विद्यालयास ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत 

स्व.सी.आर. रंगनाथन् कर्णबधीर विद्यालयास ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत 

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट चा पुढाकार

पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची उपस्थिती
पुणे : धार्मिकतेसोबत सामाजिकता जपणा-या अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट च्या वतीने आयोजित म्हसोबा उत्सवात स्व.सी.आर. रंगनाथन् निवासी कर्णबधीर विद्यालयास ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मंडईतील बुरूड आळी येथे झालेल्या कार्यक्रमाला पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा उपस्थित होते.

तसेच यावेळी संग्राम मुरकुटे, अरुण घोडके, कुमार रेणुसे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह कार्यकर्ते देखील उपस्थित होते. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र भोसले व कर्णबधीर मुलांनी धनादेश स्विकारला. कार्यक्रमानंतर सर्व मुलांकरिता स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

रंजनकुमार शर्मा म्हणाले, शारिरीकदृष्टया दिव्यांग असलेल्या मुलांना मदतीचा हात देणे ही कौतुकास्पद काम आहे. दिव्यांग मुला-मुलींना सण-उत्सवाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न ट्रस्टने केला आहे. यामुळे या दिव्यांग मुलांमध्ये देखील वेगळी उर्जा निर्माण होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले. उत्सवात अन्नदान सेवा, भजनी मंडळाचे कार्यक्रम, ढोल-ताशा वादन देखील सुरु आहे. अबोली सुपेकरे यांनी सूत्रसंचालन केले.

* दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव
रविवार, दिनांक ४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता मंडई बुरुड आळीतील मंदिरात दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प.पू. कालीपूत्र कालीचरण महाराज उपस्थित राहणार आहेत. फिरत्या रंगीबेरंगी दिव्यांची व फुलांची  आकर्षक आरास यानिमित्ताने  होणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
36.2 ° C
36.2 °
36.2 °
41 %
1.6kmh
85 %
Fri
36 °
Sat
39 °
Sun
38 °
Mon
31 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!