पुणे- हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात येत असुन यामध्ये शासकीय संस्थासोबत ,सरकारी,खाजगी शाळाही सहभागी झाल्या आहेत. राज्यातही ही मोहीम मोठया उत्साहात सुरु आहे. पुणे शहरातील कोथरुड परिसरातील महेश विद्यालय मराठी माध्यम च्यावतीने क्रांतीकारकांच्या पोषाखात शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी मुलांनी भारत माता की जय ,हर घर तिरंगा या घोषणा दिल्या तसेच यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर यांनी उपस्थित मुलांना तिरंगा प्रतिज्ञा दिली. जगभरातील अधिकाधिक भारतीयांना त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरता हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली आहे. हे राष्ट्र उभारणीत सहभागी झालेल्या सर्व क्रांतीवीराच्या समर्पणाचे आणि राष्ट्रध्वजाशी संबंधित वैयक्तिक संलग्नतेचे प्रतीक म्हणून हे अभियान महत्वाचे असल्याचे मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर यांनी सांगितले.शाळासमितीचे अध्यक्ष सचिन मंत्री यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती पर माहिती दिली.
समाज कार्याचा मूलमंत्र पथनाट्य
महेश विद्यालय मराठी माध्यमाच्या शाळेत तेरा ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांचे पथनाट्य आयोजित केले होते.सध्या श्रावण महिना सुरू आहे या महिन्यात दर सोमवारी शंकराच्या मंदिरात महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो तसेच महादेवाच्या पिंडीला १००० बिल्वपत्र वाहिले जाते. या धार्मिक श्रद्धेला लोकांनी अंधश्रद्धेचे रूप दिल्यामुळे समाजातील लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलना निमित्त जनजागृती करण्यासाठी महेश विद्यालय मराठी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी समाजकार्याचा मूलमंत्र हे पथनाट्य कोथरूड येथील शिवाजी पुतळ्या जवळच्या नावाजलेल्या परिसरात सादर केले.
या पथनाट्यात एकूण 22 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता घोषवाक्य गीत या माध्यमातून समाजाचा दानधर्म, वृक्षारोपण ,राग द्वेष ,अहंकार यांचा त्याग करणे आधी मूल्यांचे महत्व पटवून दिले. या नाटकाचे लेखन प्रशालेच्या शिक्षिका स्वाती हुमनाबादकर यांनी केले पथनाट्याची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका जानवी अजोतीकर यांची होती या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात शाळा समितीचे अध्यक्ष माननीय सचिन जी मंत्री सचिव ओमप्रकाश जी का सर उपस्थित होते सर्व शिक्षक वृंदांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.