पुणे :- हवेली क्र. 6चे सह दुय्यम निबंधक यांनी तुकडे बंदी,तुकडे जोड कायद्याचा व रेरा कायद्याचा भंग करून दस्त नोंदणी केली असून त्याची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांच्याकडे होत आहे़. मागील वर्षभरा पासुन या कार्यालयामध्ये बोगस कागदपत्राच्या आधारे व रेरा कायदयाचा भंग करून ग्रामपंचायत फ्लॅटच्या सदनिकांची दस्त नोंदणी करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पदाचा गैर वापर करून काही ठराविक एजंट ला जवळ करून स्वत:च्या आर्थिक लाभाकरीता ले आउट मंजूर करून प्लॉट पाडून विक्री करण्यात आल्यास अशा दस्तांची नोंदणी करावी. या संदर्भात परिपत्रक नोंदणी महानिरीक्षकांनी काढले आहे. मात्र या कायद्याचे या परिपत्रकाचे उलंघन करून सर्व प्रकारच्या दस्तांची नोंदणी व ग्रामपंचायत मधल्या बिल्डिंग च्या प्लॅटची दस्त नोंदणी केली आहे. अशा प्रकारचे हजारो दस्त नोंदणी करून देखील या अधिकाऱ्यावर वरिष्ठांकडुन कोणत्याही प्रकारचीकारवाई करण्यात आलेली नाही कारण हा अधिकारी दोन महिन्यात सेवानिवृत्त होणार असल्याने कुठल्याही नियमांचे पालन न करता दस्त नोंदविण्यास पाठींबा तर देत नाहीत ना असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे ?सर्व प्रकरणाची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी. अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.
हवेली 6 चे सह दुय्यम निबंधक यांची चौकशी करा!
सर्वसामान्य जनतेमधून मागणी
RELATED ARTICLES
New Delhi
scattered clouds
30.5
°
C
30.5
°
30.5
°
72 %
2.5kmh
46 %
Sat
30
°
Sun
37
°
Mon
32
°
Tue
37
°
Wed
36
°