सध्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला पक्षांमध्ये विचारलं जात नाही गेली 40 वर्षे मी राजकारणातून समाजसेवा करत आली परंतु याची पक्षाकडून कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर मला या निवडणुकीत अपक्ष अर्ज ठेवावा लागला जणू ही तर राजकीय आत्महत्या म्हटले तर वावगे ठरणार नसल्याची खंत कसबा विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार कमलताई व्यवहारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.पुणे शहरात आठ मतदारसंघात आहेत. यातील कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तिकीट न मिळाल्यानं अपक्ष अर्ज दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा 4 नोव्हेंबर एकच दिवस होता. अखेरच्या क्षणी बंडबांना शांत करता-करता महायुती आणि महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांची चांगलीच दमछाक झाली. कुणी बंड कायम ठेवलंय, तर कुठे शांत राहण्याची भूमिका उमेदवारांनी घेतली आहे. पण, पुण्यात महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपला बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत.
पुणे शहरात आठ मतदारसंघात आहेत. यातील कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तिकीट न मिळाल्यानं अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याची शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मागे न हटण्याची भूमिका घेतली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर कमल व्यवहारे आणि माजी नगरसेवक मुख्तार शेख लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, काँग्रेसनं पुन्हा रवींद्र धंगेकर यांना संधी दिली आहे. नाराज झालेल्या कमल व्यवहारे आणि मुख्तार शेख यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र, शेख यांची नाराजी दूर करण्यात महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. कमलताई व्यवहारे यांनी आपला अर्ज कायम ठेवत निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे यावेळी सांगितले त्यांना किटली हे चिन्ह देण्यात आले.