पुणे : जागतिक शहराचा नावलौकिक असलेले व देशाची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहराचा पोलीस आयुक्त म्हणून कारभार करणे आनंददायी व सन्मान जनक असल्याची भावना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात व्यक्त केली.
शहरातील प्रभावी कामगीरी बद्दल पुणे शहरातील विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांकडून व माजी लोकप्रतिनिधींकडून वाढदिवसानिमित्त अमितेश कुमार यांचा त्यांचे दालनात विशेष सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुणे शहराची ओळख असलेले महात्मा फुले यांची पगडी , उपरणे व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी चे अध्यक्ष राहुल डंबाळे , शिवसेनेचे उपनेते अजय भोसले , माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के , माजी नगरसेवक आनंद अलकुंटे , माजी नगरसेवक ॲड. गफूर पठाण , माजी नगरसेवक अय्युब शेख , माजी नगरसेवक हिमाली कांबळे , रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे , मा. नगरसेवक रफिक शेख , सामाजिक कार्यकर्ते आबिद सय्यद , जास्मिन शेख , रेश्मा खान , यांचेसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.