ब्राह्मण म्हणजे संस्कार!!
हे संस्कार, परंपरा टिकवण्यासाठी, आपल्या पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी, पौरोहित्य करणारे आपले बांधव, भगिनी एकत्र संघटित होणे ही काळाची गरज आहॆ व त्यांना एका सामाजिक विचाराखाली एकत्र आणण्याचे काम अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा अध्यक्ष श्री मंदार रेडे यांनी केले.

नुकताच पार पडलेल्या पुरोहितांच्या भव्य मेळाव्यात अनेकांनी, शहरासोबत खेडो-पाडी पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांना देखील या सामाजिक प्रवाहात जोडून घेण्याची इच्छा व्यक्त केली.
त्या अनुषंघाने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्हा पुरोहित आघाडीतर्फे शहर, ग्रामीण भागातील सुमारे 82 पुरोहितांना नियुक्ती पत्रके देण्यात आली यामध्ये महिला पुरोहितांचा देखील समावेश आहॆ व हा प्रवास पुढेही चालू राहणार आहॆ असे सांगण्यात आले.
शहर व ग्रामीण भागातील पुरोहितांना संघटित करण्यासाठी विभागवार 24 जिल्हा संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली ज्यांच्याद्वारे आगामी वर्षभरात महासंघातर्फे एक हजार पुरोहित संघटित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहॆ.
आजच्या या नियुक्ती पत्रके प्रदान कार्यक्रमाला मंदार रेडे, संतोष वैद्य गुरुजी, राहुल भाले शास्त्री, अतुल जोशी, मनीष जोशी गुरुजी, उमेश जोशी गुरुजी व अनेक पुरोहित आवर्जून उपस्थित होते.
पुरोहित संघटन वाढवण्यासाठी हवेली, पुरंदर, इंदापूर, बारामती, शिरूर, दौंड,मुळशी या तालुक्याच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहॆ.


