28.5 C
New Delhi
Thursday, September 11, 2025
Homeमहाराष्ट्रशिक्षक कृतज्ञता सोहळा दिमाखात संपन्न

शिक्षक कृतज्ञता सोहळा दिमाखात संपन्न

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा शिक्षक आघाडी तर्फे, शिक्षक दिनाचे औचित्य साधुन पुणे जिल्ह्यातील नामवंत अशा 75 शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम🚩🙏

या कार्यक्रमाला श्री शैलेंद्र देवळाणकर (संचालक, उच्च शिक्षण) प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ गोविंद कुलकर्णी, पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, शिक्षक आघाडी अध्यक्ष राजेंद्र जोशी आवर्जून उपस्थित होते.

नवीन शिक्षण प्रणाली अनेक सकारात्मक बदल घडून आणेल व यामुळे शिक्षकांना त्यांच्या कौशल्यविकासाला वाव मिळेल असे प्रतिपादन डॉ गजानन एकबोटे यांनी केले.
या कार्यक्रमात प्रोग्रेसिव्ह एडुकेशन सोसायटी चे चेअरमन डॉ गजानन एकबोटे यांचा जीवन गौरव शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रा. माधवी नानल, प्रदीप पुराणिक व मेघना भावे या शिक्षकांना शिक्षणरत्न पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
प्रा. निवेदिता एकबोटे यांचा मॉडर्न कॉलेज च्या प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

डॉ शैलेंद्र देवळाणकर यांनी आपल्या भाषणात, शिक्षकांना प्रगतीचा कानमंत्र दिला व आपल्या सोबत उत्तम विद्यार्थी घडवून देशासाठी योगदान देण्याची गरज आहॆ असे सांगितले.

डॉ गोविंद कुलकर्णी यांनी आत्मनिर्भर उद्योजक घडवण्यासाठीच्या योजनांची माहिती दिली.
मंदार रेडे यांनी आगामी काळात सर्व मान्यवर शिक्षण तज्ज्ञ शिक्षकांची एक राज्यस्तरीय समिती बनवून संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक कौशल्य विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

शिक्षक आघाडी अध्यक्ष प्रा. राजेंद्र जोशी यांनी प्रास्ताविक केले, गीता देशमुख व ममता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, श्रुती कुलकर्णी यांनी आभार मानले. या यशस्वी कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. शुभांगी दौतखाने, भाग्यश्री सुपनेकर, वैशाली कमाजदार, हर्षद गाडगीळ, विकास कंकाळ, वसंत कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
28.5 ° C
28.5 °
28.5 °
66 %
4.5kmh
8 %
Thu
33 °
Fri
36 °
Sat
37 °
Sun
37 °
Mon
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!