38.5 C
New Delhi
Thursday, April 17, 2025
Homeमहाराष्ट्रविधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा नागरी सत्कार - योगेश बहल

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा नागरी सत्कार – योगेश बहल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार नागरी सत्कार

पिंपरी,- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. बुधवारी (दि. ९) हॉटेल रागा पॅलेस, मदर तेरेसा उड्डाणपूल, काळेवाडी, पिंपरी, पुणे १८ येथे सायंकाळी पाच वाजता या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी मंगळवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, उमाताई खापरे, अमित गोरखे, आरपीआय (आठवले गट) चे सर्व प्रमुख पदाधिकारी, युती सरकारमधील सर्व मित्र पक्षांचे शहराध्यक्ष, पदाधिकारी, माजी महापौर, माजी नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे पदाधिकारी, बचत गटांचे प्रतिनिधी, महिला, युवक, युवती, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळ, ट्रस्ट व शहरातील नागरिक विविध पक्षांचे सन्माननीय पदाधिकारी व विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळाचे विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार विलास लांडे पाटील, माजी महापौर मंगलाताई कदम,अपर्णाताई डोके, माजी विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे, राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, फजल शेख, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, भोसरी विधानसभा संघटक प्रकाश सोमवंशी, पिंपरी विधानसभा संघटक नारायण बहिरवाडे, शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, सामाजिक न्याय अध्यक्ष गंगा धेंडे, शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, अल्पसंख्यांक अध्यक्ष युसुफ कुरेशी, सेवादल अध्यक्ष महेश झपके, असंघटित कामगार सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ,युवक पिंपरी विधानसभा अध्यक्ष अक्षय माछरे, दीपक साकोरे, शक्रूला पठाण, धनाजी तांबे, माऊली मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी योगेश बहल यांनी सांगितले की, माजी मंत्री स्वर्गीय प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर पिंपरी चिंचवड शहराला मंत्रीपदाचा दर्जा असणारे पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मिळाले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या दृष्टीने हा एकनिष्ठ कार्यकर्त्याला मिळालेला सन्मान आहे. अण्णा बनसोडे यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती पदावर काम केले आहे. तसेच ते पिंपरी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार म्हणून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आले आहेत. अण्णा बनसोडे हे पक्षाच्या प्रती एकनिष्ठ आहेत. शहरातील सर्वसामान्य गोरगरीब, उपेक्षित समाजात त्यांचा दांडगा संपर्क आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमध्ये विधानसभेचे उपाध्यक्षपद देऊन अण्णा बनसोडे यांना न्याय दिला आहे.
राज्यात आणि केंद्रात आता एका विचाराचे सरकार आहे. त्यामुळे वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराशी संबंधित अनेक प्रश्न, नागरी समस्या लवकर सुटतील असा विश्वास आहे. यामध्ये पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वैद्यकीय सेवा सुविधा, वाहतूक व्यवस्था, पीएमपीएमएलची सेवा, विस्तारित मेट्रो प्रकल्प, गोरगरीब नागरिकांसाठी घरकुल प्रकल्प या विषयावर निर्णय होणे अपेक्षित आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
38.5 ° C
38.5 °
38.5 °
14 %
3.1kmh
0 %
Thu
42 °
Fri
43 °
Sat
42 °
Sun
41 °
Mon
41 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!