पुणे,- : स्वर्गीय श्री अशोकजी सिंघल जी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या भारतात्मा वेद पुरस्काराचे वितरण १७ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. पुण्यातील दादासाहेब दरोडे सभागृह, आगरकर रोड, बीएमसीसी कॉलेंज जवळ , शिवाजीनगर येथे होणाऱ्या समारंभात परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत आणि परमपूज्य आचार्यजी श्री प्रद्युम्नजी महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. भारतात्मा वेद पुरस्काराच्या माध्यमातून वैदिक शिक्षण आणि विद्वत्तेचा गौरव करण्यात येतो.
विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक सदस्य असलेल्या स्व. सिंघल यांनी श्रीराम जन्मभूमी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले. ते भारताच्या प्राचीन ज्ञानाचे एकनिष्ठ अनुयायी होते तसेच वैदिक ज्ञान परंपरा आणि गुरुकुल शिक्षण प्रणालीच्या पुनरुज्जीवन आणि प्रसारासाठी अत्यंत कटिबद्ध होते. स्व. सिंघल यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात वेदांचा अभ्यास आणि आचरण यांचे जतन व त्याला प्रोत्साहन देण्यासाठी अमूल्य योगदान दिले.
भारतात्मा वेद पुरस्काराचे गेल्या आठ वर्षांपासून दरवर्षी प्रदान केला जात असून हे त्याचे नववे वर्ष असून आहे. तीन श्रेणींमध्ये असामान्य योगदानांचा या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव करण्यात येतो.
•उत्कृष्ट वैदिक विद्यार्थी – ₹३ लाख रोख
•आदर्श वैदिक शिक्षक – ₹५ लाख रोख बक्षीस
•उत्कृष्ट वैदिक संस्था – ₹७ लाख रोख बक्षीस
प्रत्येक पुरस्कृताला प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हही प्रदान करण्यात येईल.
या समारंभात वेद अर्पित जीवन सन्मान म्हणजेच जीवनगौरव वैदिक समर्पण पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे. वैदिक ज्ञानाचा अभ्यास, अध्यापन आणि सराव करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या विद्वानांना हा सन्मान दिला जातो. रोख ५ लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
याच समारंभात भारतात्मा वेद पुरस्कार २०२५ च्या विजेत्यांची घोषणा केली जाईल.


