18.1 C
New Delhi
Tuesday, February 10, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी सौ. पल्लवी गाडगीळ यांची निवड

महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी सौ. पल्लवी गाडगीळ यांची निवड

पुणे- महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने पुणे जिल्हा अध्यक्षपदी सौ. पल्लवी समीर गाडगीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे पुणे जिल्ह्यातील ब्राह्मण समाजात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या नियुक्तीबद्दल सौ. गाडगीळ यांनी मा. अतुलजी व्यास (राष्ट्रीय अध्यक्ष), मा. मयुरेश अरगडे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) तसेच मा. चैतन्य जोशी (महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष) यांचे आभार मानले आहेत. शताब्दी वर्षात संस्थेची जबाबदारी मिळणे ही सन्मानाची बाब असून, ही संधी समाजहितासाठी प्रभावीपणे वापरण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.


पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या कार्याचा विस्तार करणे, संघटन अधिक मजबूत करणे तसेच समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी नमूद केले. संस्थेचे कार्य अधिक लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी सर्व ब्राह्मण समाजबांधवांनी एकत्र येऊन महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. संस्थेच्या प्रगतीसाठी आपला सक्रिय व सकारात्मक सहभाग राहील, अशी ग्वाही देत त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
18.1 ° C
18.1 °
18.1 °
72 %
1.5kmh
0 %
Tue
19 °
Wed
27 °
Thu
26 °
Fri
27 °
Sat
28 °

Most Popular

Recent Comments