पुणे- : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राज्याच्या उच्च शिक्षणमंत्र्यांनी विविध क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या समाजगुरुंचा सन्मान करावा या संकल्पनेतून सुरू झालेल्या कार्यक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे. त्यानिमित्ताने येत्या शनिवार, 26 जुलै राजी सायं. 4 वाजता कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात (कर्वे नगर) होणाऱ्या सोहळ्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
यामध्ये भारतीय हवाई दलाचे निवृत्त उपप्रमुख एअर मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ निरुपणकार डॉ. शंकर अभ्यंकर, पुण्यात हायड्रोजनवरील बसची निर्मिती करणारे प्रसिद्ध उद्योजक डॉ. रवी पंडित, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक – विचारवंत माधव भांडारी, पुणे आयसरचे संचालक डॉ. सुनील भागवत, स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे (डिक्की) संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे, जुन्या पिढीतील अभिनेत्री निर्मलाताई गोगटे, नाट्यसंगीताच्या क्षेत्रातील प्रसिद्ध गायिका आशाताई खाडिलकर, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, दिव्यांगांसाठी सातत्याने कार्यरत असणारे जनसेवा बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ, गुडविल इंडियाचे कालिदास मोरे आदिंचा सन्मान या सोहळ्यात होणार आहे. या कार्यक्रमास अधिकाधिक पुणेकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन या सोहळ्याचे समन्वयक भालचंद्र कुलकर्णी यांनी केले आहे.
गुरुपौर्णिमा सोहळ्यानिमित्त ना.चंद्रकांत पाटील हस्ते विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
27.2
°
C
27.2
°
27.2
°
77 %
2.1kmh
96 %
Wed
27
°
Thu
41
°
Fri
39
°
Sat
38
°
Sun
36
°