बाणेर मधील ननवरे चौक ते पॅन कार्ड कोथरुडमधील एकलव्य कॉलेज जवळील मिसिंग लिंकच्या कामाला गती
कोथरुड मतदारसंघ वाहतूककोंडी मुक्तीच्या दिशेने जलदगतीने पुढे जात असून; ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील बहुतांशी मिसिंग लिंकच्या कामाने गती मिळालेली आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. नुकतेच कोथरुड मतदारसंघातील बाणेर भागातील ननवरे चौक ते पॅन कार्ड रेखांकन पूर्ण झाले आहे. तर एकलव्य कॅालेज येथील मिसिंग लिंकचे काम पूर्ण करण्यासाठी २५०० स्क्वेअर फिट जागा महापालिकेला हस्तांतरित झाली आहे.
कोथरुड मतदारसंघातील मिसिंग लिंक पूर्ण करुन वाहतूककोंडी मुक्त कोथरुडसाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार आग्रही असून; सदर मिसिंग लिंकसाठी महापालिका आयुक्तस्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहे. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे मिसिंग लिंकसाठी जमीन अधिग्रहण तथा इतर अडचणी सोडवण्यास गती मिळाली आहे.
यापूर्वी एरंडवणे येथील रजपूत वीटभट्टी परिसरातील जमीन अधिग्रहित होऊन; रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर सुतारवाडी भागातील रस्ता रुंदीकरणासाठी जमीन हस्तांतरण पूर्ण झाले आहे. याशिवाय बाणेर मधील ननवरे चौक ते पॅन कार्ड रेखांकन महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पूर्ण झाले आहे. तर कोथरुड मधील एकलव्य कॉलेज येथील रस्त्यासाठी २५०० स्क्वेअर फूट जागा महापालिकेकडे हस्तांतरित झाली असून,सदर रस्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे. त्यामुळे वाहतूककोंडी मुक्त कोथरुडसाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे.