पुणे- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने १७ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष
डॉ. शरद गोरे यांनी दिली आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे प. म. कार्याध्यक्ष. विक्रम मालन आप्पासो शिंदे उपस्थित होते.

ग्रंथपूजनाने या संमेलनाची सुरुवात होणार असून त्यानंतर उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, परिसंवाद, कविसंमेलन असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे. १६ भाषांमध्ये पारंगत असलेले बुधभूषण, नायिकाभेद, सातशतक, नखशिख, ग्रंथाचे लेखन करून मानवी मूल्यांपासून राजनीती, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नैतिकशास्त्र, धर्मशास्त्र, विधीशास्त्र, न्यायशास्त्र, वनस्पतीशास्त्र, यासह अनेक विषयांत निष्णात असलेले जागतिक कीर्तीचे विचारवंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्यिक पैलूंचा व त्यांच्या इतिहासाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून या साहित्य संमेलनाचे आयोजन दरवर्षी राज्यभरात विविध ठिकाणी केले जाते. आतापर्यंत राज्यात छ. संभाजी महाराज यांच्या नावाने १६ साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पडली आहेत. पुण्यात होणाऱ्या या साहित्य संमेलनात रसिक साहित्यिकांनी सहभागी व्हावे यासाठीही आवाहन यावेळी करण्यात आले.