निमसाखर (ता. इंदापूर) : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीची भव्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. सकाळपासूनच गावात भक्तीमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
प्रत्येक चौकात व घरासमोर स्वामीभक्त महिलांनी सुंदर रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले. “जय जय स्वामी समर्थ” अशा घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमला. पालखी विठ्ठल मंदिरात पोहोचल्यावर सामूहिक जप व आरतीचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी चैतन्य यल्लाप्पा वाघमोडे यांच्या वतीने उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला महिला, लहान मुले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यामुळे गावात आनंद, भक्ती आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून, त्रिपुरारी पौर्णिमेचा हा सोहळा स्वामीभक्तांच्या मनात चिरंतन ठसा उमटवून गेला.


