पुणे : महामाता रमामाई आंबेडकर यांच्या नावाने पुण्यात भव्य सांस्कृतिक भवन उभारू अशी ग्वाही विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांनी दिली.
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खंबिरपणे साथ देणाऱ्या महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या वाडिया कॉलेजसमोरील स्मारकास भेट देऊन बनसोडे यांनी रमामाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्या वेळी ते बोलत होते. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, डॉ. गौतम बेंगाळे यांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रत, पंचशिल शाल देऊन बनसोडे यांचा सन्मान करण्यात आला. सोनू निकाळजे, राहुल शिरसाठ, आनंद साळुंखे, डॉ. मिलिंद तायडे, के. एस. सूर्यवंशी, वसंत बोले, धनराज तावडे, एस. डी. गायकवाड, श्रीनाथ कांबळे, राहुल शिंदे, विजय कांबळे, भाग्यश्री साळुंखे, प्रशांत कसबे, रामदास लोखंडे आदी उपस्थित होते.

रमाई आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश अण्णा बनसोडे यांनी महापालिकेचे वास्तुविशारद आनंद साळुंखे यांना दिले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना स्मारकाची माहिती देऊन महापालिकेचे आयुक्त यांच्यासोबत रमामाई स्मारकाच्या सदस्यांची बैठक आयोजित करू, सांस्कृतिक भवनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देऊ असे अण्णा बनासोडे म्हणाले.


