10.1 C
New Delhi
Wednesday, December 17, 2025
Homeमहाराष्ट्रमहानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती

पिंपरी, – : राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम १५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी बहुसदस्यीय पद्धतीने ३२ प्रभागातील १२८ जागांसाठी निवडणूक होणार असून १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी ८ निवडणूक निर्णय अधिकारी आणि २४ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर याच्या स्वाक्षरीने याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक पार पडत असून चार सदस्यीय प्रभागरचना असणार आहे. चार प्रभागांकरीता १ असे एकूण ८ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सहाय्यक म्हणून ३ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कामकाज पाहणार आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राज्य निवडणूक आयोग, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, निवडणूक विभागाचे उपायुक्त तथा नोडल अधिकारी यांच्या सूचना व आदेशानुसार तसेच महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार निवडणुकीचे सर्व कामकाज काटेकोरपणे पार पाडावे, असे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे.
…..
प्रभागनिहाय नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी

प्रभाग क्रमांक १०, १४, १५ व १९ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पल्लवी घाटगे (उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. ४, पुणे ) यांची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविनाश डोईफोडे, निवेदिता घार्गे, वैशाली ननावरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे कार्यालय स्थानिक संस्था कर कार्यालय, हेडगेवार भवन, प्राधिकरण, निगडी येथे असणार आहे.

प्रभाग क्रमांक १६, १७, १८ व २२ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हणुमंत पाटील (उपजिल्हाधिकारी, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, बारामती) यांची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रवींद्र कुलकर्णी, राजाराम सरगर, चंद्रकांत मुठाळ यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे कार्यालय ब क्षेत्रीय कार्यालय, लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव येथे असणार आहे.

प्रभाग क्रमांक २, ६, ८ व ९ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हिम्मत खराडे (उपजिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) यांची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजिनाथ गजरे, सुनिलदत्त नरोटे, दशरथ कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे कार्यालय क क्षेत्रीय कार्यालय, पॉलिग्रास हॉकी स्टेडियमजवळ, एमआयडीसी, भोसरी येथे असणार आहे.

प्रभाग क्रमांक २५, २६, २८ व २९ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल पवार (उपजिल्हाधिकारी, विभागीय कार्यालय, सारथी) यांची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महमंद पाप्पा सय्यद, आश्विनी गायकवाड, सुनिल शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे कार्यालय ड क्षेत्रीय कार्यालय, औंध–रावेत बीआरटी रोड, रहाटणे येथे असणार आहे.

प्रभाग क्रमांक ३, ४, ५ व ७ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिप्ती सूर्यवंशी (उपजिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) यांची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रविण ढमाले, तानाजी नरळे, सुर्यकांत मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे कार्यालय कबड्डी प्रशिक्षण संकुल, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या मागे, भोसरी येथे असणार आहे.

प्रभाग क्रमांक १, ११, १२ व १३ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नितीन गवळी (उपजिल्हाधिकारी, प्रादेशिक औद्योगिक अधिकारी) यांची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनिषा बोबले, अतुल पाटील, शिवाजी चौरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे कार्यालय सेक्टर १७/१९, स्पाईन रोड शेजारी, घरकुल चिखली टाउन हॉल येथे असणार आहे.

प्रभाग क्रमांक २१, २३, २४ व २७ साठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुप्रिया डांगे (उपजिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) यांची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हरिदास चाटे, विजय सोनवणे, हेमंत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे कार्यालय ग क्षेत्रीय कार्यालय, वेंगसरकर अकादमीच्या मागे, थेरगाव येथे असणार आहे.

प्रभाग क्रमांक २०, ३०, ३१ व ३२ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अर्चना पठारे (उपजिल्हाधिकारी, प्रादेशिक औद्योगिक अधिकारी) यांची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गौरी तेलंग, सतिश वाघमारे, सोहन निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे कार्यालय मनपाचे कासारवाडी भाजी मंडई (दुमजली हॉल), शास्त्रीनगर, कासारवाडी येथे असणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
10.1 ° C
10.1 °
10.1 °
87 %
2.1kmh
39 %
Wed
27 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!