28 C
New Delhi
Saturday, October 11, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी चिंचवड महापालिका शाळांमध्ये गुणवत्तेचा झपाट्याने वाढता आलेख

पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमध्ये गुणवत्तेचा झपाट्याने वाढता आलेख

पिंपरी, – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १२८ शाळांमध्ये प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली आहे. २०२३–२४ या शैक्षणिक वर्षात २८% विद्यार्थी शिकण्याच्या प्रारंभिक (बिगिनर) पातळीवर होते, तर २०२४–२५ मध्ये ही टक्केवारी केवळ १३ टक्क्यांवर आली आहे. त्याचबरोबर प्रगत (अँडव्हान्स) पातळीवरील विद्यार्थ्यांची टक्केवारी ०.५% वरून थेट ६% पर्यंत वाढली आहे. ही सुधारणा केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून, वर्गखोल्यांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांची साक्ष आहे.

QCI मूल्यमापन आणि ‘सक्षम’ उपक्रमाचा प्रभाव

या बदलामागे भारतीय गुणवत्ता परिषदेने (QCI) तयार केलेल्या शैक्षणिक मूल्यमापन पद्धतीचा मोठा वाटा आहे. या पद्धतीद्वारे इयत्ता १ ते १० मधील ४८ हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे गणित, भाषा, विज्ञान व पर्यावरण या विषयांमध्ये मूल्यमापन करण्यात आले. वर्षाच्या सुरुवातीला व शेवटी घेतलेल्या या मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा ठोस मागोवा घेता आला. मिळालेल्या माहितीच्या आधारे शिक्षकांनी वर्गपातळीवर त्वरित कृती केल्या आणि त्याचा थेट परिणाम गुणवत्तेवर दिसून आला.

याशिवाय, ‘सक्षम’ उपक्रमामुळे इयत्ता ३ ते ८ मधील ३० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि गणित विषयात लक्षणीय सुधारणा करता आली. या उपक्रमाचा दुसरा टप्पा सध्या सुरू असून, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

शिक्षणात विश्लेषणाधारित बदल

QCI मूल्यमापन पद्धती व सक्षम उपक्रमामुळे पीसीएमसी शाळांमध्ये शिकवण्याची पद्धत अधिक संरचित, परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण बनली आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. पालकांचाही सहभाग वाढवण्यात येत आहे. शाळेच्या पहिल्या दोन तासांमध्ये भाषा आणि गणितावर विशेष भर देण्यात आला, तर दुसऱ्या टप्प्यात ही वेळ ४० मिनिटांच्या दोन सत्रांमध्ये विभागली गेली आहे.

ठळक शैक्षणिक प्रगती

  • इयत्ता १ ते १० मधील ४८,०००+ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन
  • बिगिनर पातळीवरील विद्यार्थी: २८% वरून १३%
  • अँडव्हान्स पातळीवरील विद्यार्थी: ०.५% वरून ६%
  • इयत्ता दुसरी: बिगिनर – ३०% वरून ७%, अँडव्हान्स – ०% वरून २५%
  • इयत्ता पहिली: बिगिनर – ५०% वरून १८%, अँडव्हान्स – ०% वरून ८%
  • इयत्ता पाचवी: बिगिनर – ५४% वरून १४%
  • सर्व शिक्षकांना कौशल्याधिष्ठित अध्यापनाचे प्रशिक्षण
  • ‘सक्षम’ उपक्रमांतर्गत ३०,०००+ विद्यार्थ्यांना लाभ
  • वाचन, लेखन व गणित कौशल्यात लक्षणीय सुधारणा

प्रशासनाची प्रतिक्रिया

शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका:
“QCI मूल्यमापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळीचे मूल्यमापन करता आले. या माहितीच्या आधारावर वर्गपातळीवर थेट कृती करता आली आणि सकारात्मक शैक्षणिक सुधारणा साधता आली. ही सुधारणा केवळ सुरुवात असून महापालिका प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वर्गानुसार आवश्यक शैक्षणिक कौशल्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे.”

प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त:
“शैक्षणिक सुधारणा प्रक्रियेमुळे महापालिकेच्या शिक्षण क्षेत्रात उत्तरदायित्व आणि उद्दिष्टांमध्ये स्पष्टता निर्माण झाली आहे. शिक्षक, मुख्याध्यापक आणि शैक्षणिक अधिकारी यांच्याकडे आता विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर आधारित माहिती संकलित झाली आहे. या माहितीच्या आधारे गरजेनुसार उपक्रम राबविण्यात येत असून यामुळे विशेषतः प्राथमिक इयत्तांमध्ये त्याचे सकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत.”

विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग:
“नियमित मूल्यमापन, शिक्षकांचे विषयानुसार मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या माहितीवर आधारित तांत्रिक सहाय्य हे या प्रगतीचे मुख्य आधारस्तंभ ठरले. यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत मागे असलेल्या शाळांनीही आता लक्षणीय सुधारणा केली आहे. विश्लेषणाधारित आणि शाळा व विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनामुळे संपूर्ण यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे.” पीसीएमसी महापालिका शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख सातत्याने वर चढताना दिसतो आहे. QCI मूल्यमापन आणि सक्षम उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. प्रशासन, शिक्षक आणि पालक यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे, प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा निर्धार खऱ्या अर्थाने फळाला येताना दिसतो आहे.
पुढील शैक्षणिक वर्षातही ही गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न सुरूच राहणार आहेत.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
28 ° C
28 °
28 °
34 %
2.2kmh
0 %
Fri
28 °
Sat
31 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!