पुणे, : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अमूल्य कार्याची दखल घेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (एमईएस) च्या नियामक मंडळाच्या स्वीकृत सदस्यपदी फ्यूएल (Friends Union for Energising Lives – FUEL) शिक्षण संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती एमईएस नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी नुकतीच केली आहे.
या प्रसंगी डॉ. देशपांडे यांना नियुक्तीपत्र, संस्थेचा इतिहासग्रंथ तसेच गुलाबपुष्प प्रदान करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या नियुक्ती नंतर फ्यूएलचे अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे म्हणाले,“एमईएसची शिक्षण क्षेत्रातील परंपरा अत्यंत समृद्ध आहे. उद्योग सहकार्य, सीएसआर सेल भागीदारी आणि नाविन्यपूर्ण शिष्यवृत्ती मॉडेल्स बळकट करण्यावर अधिक भर देण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी केंब्रिज विद्यापीठातील Philanthropy Model क्षेत्रातील अनुभवाचा प्रभावी उपयोग करणार आहे,”
डॉ. केतन देशपांडे यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविले आहे. युवकांना कौशल्याधारित शिक्षणाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे ते एक प्रभावी नेतृत्व आहेत.
रोजगाराभिमुख शिक्षणासाठी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर व्यापक कार्य केले आहे. आधुनिक शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण यांची प्रभावी सांगड घालून विद्यार्थ्यांच्या शिक्षण व संधीच्या समान हक्कांना बळकटी देण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
फ्यूएल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे.
एमईएसच्या नियामक मंडळाच्या स्वीकृत सदस्यपदी डॉ. केतन देशपांडे यांची नियुक्ती.
RELATED ARTICLES
New Delhi
haze
15.1
°
C
15.1
°
15.1
°
63 %
1kmh
0 %
Wed
19
°
Thu
25
°
Fri
20
°
Sat
19
°
Sun
20
°


