27.1 C
New Delhi
Thursday, June 5, 2025
Homeमहाराष्ट्रअनोख्या पद्धतीने मिळालेल्या श्रीराम मूर्तीचा जन्मोत्सव साजरा

अनोख्या पद्धतीने मिळालेल्या श्रीराम मूर्तीचा जन्मोत्सव साजरा

केतकी देशपांडे कुटुंबीयांची मंत्रमुग्ध करणारी कहाणी

पुणे- केतकी देशपांडे कुटुंबीय ,अपूर्व सोनटक्के, बाळासाहेब गिरम ,सुनील पांडे या श्रीराम भक्तांच्या पुढाकारातून दामले सभागृह विधी रस्ता येथे श्रीराम जन्माचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने गीतरामायणासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले.

वृंदा बाम यांच्यासह त्यांच्या स्वरतरंग संगीत विद्यालय या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात गीत रामायण सादर केले. त्याचप्रमाणे राष्ट्रसेविका समिती प्रभावी शाखेच्या वतीने रामरक्षा पठण आणि राम नाम जपाचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे कुंदा पानसे यांच्या नेतृत्वाखाली ईशभक्ती भजनी मंडळाने भक्ती गीते सादर केली. केतकी देशपांडे अपूर्व सोनटक्के, बाळासाहेब गिरम, सुनील पांडे, आदींनी या अनोख्या सोहळ्याचे आयोजन केले होते.रंजना नाईक, प्रिया रानडे, सुवर्णा ऋषी,योगेश जोगळेकर या रामभक्तांनी मनोभावे सेवा केली .

श्री महाराज यांची निस्सिम भक्ती करणाऱ्या केतकी देशपांडे कुटुंबिय यांना कुमठेकर रस्त्यावरील एका गणेशोत्सव मंडळाने सादर केलेल्या देखाव्यातील श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती अनपेक्षितपणे प्राप्त झाल्या. हा श्री गोंदवलेकर महाराज यांचा प्रसाद असल्याचे मानून केतकी देशपांडे कुटुंबीयांनी या मूर्तींचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला. आपले घर हेच एक मंदिर होऊन जावे, अशी देशपांडे यांची भावना आहे. त्याच दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत त्यांना अनेक श्रीराम भक्तांची साथ आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
27.1 ° C
27.1 °
27.1 °
48 %
1.2kmh
14 %
Thu
35 °
Fri
43 °
Sat
45 °
Sun
45 °
Mon
45 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!