24.1 C
New Delhi
Friday, October 31, 2025
Homeमहाराष्ट्रबाबीर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

बाबीर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

तब्बल सोळा वर्षांनी भरली बाबीर विद्यालयात दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा.

इंदापूर- : इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालय रुई या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला, तब्बल सोळा वर्षांनी श्री बाबीर विद्यालयातील सन २००८ ची बॅच मधील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्रित येऊन स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबीर विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळेतील पर्यवेक्षक धनाजी गावडे, शिक्षक दादासाहेब निटवे, उस्मान मुलाणी, सुनील दराडे, अमीन मुल्ला, आप्पासाहेब डोंबाळे तसेच सेवानिवृत्त शिक्षक गौतम सोनवणे, महादेव करे शिक्षिका मीराताई पाटील व कर्मचारी संजय भगत तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीची प्रतिमा व शाळेचे संस्थापक अध्यक्ष स्व.आत्माराम (भाऊ) पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली व दिप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेतील शिक्षकांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांचाही शिक्षकांनी सन्मान केला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रत्येकाच्या आयुष्यातील घडलेले क्षण सर्वांसमोर बोलून व्यक्त केले. प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. शिक्षकांनी देखील मनोगत व्यक्त केले सर्वांनी आयुष्यात मोठी प्रगती करावी. सर्वांनी चांगल्या मार्गाने आयुष्य जगावे. गुरूंना व शाळेला विसरू नये असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी मारकड यांनी केले, आभार विष्णू मारकड यांनी मानले.
विद्यालयात शिकत असताना खेळलेले खेळ, केलेल्या गमती-जमती, जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याचा व मनसोक्त गप्पागोष्टी करण्याचा व त्याकाळी शिक्षकांनी केलेल्या शिक्षेचा अनुभव सांगितला.सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने घेतला. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा वर्ग भरवण्यात आला यावेळी शिक्षक गौतम सोनवणे, दादासाहेब निटवे, सुनिल दराडे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा तास घेतला यावेळी शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले व जुन्या आठवणी पुन्हा नव्याने उजळून निघाल्या विद्यार्थ्यांनी कविता व बाराखडी म्हणून दाखवली. त्याचबरोबर मुला मुलींनी खो-खो खेळण्याचा आनंद घेतला.शेवटी सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाचा समोर करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
24.1 ° C
24.1 °
24.1 °
83 %
1kmh
20 %
Fri
28 °
Sat
32 °
Sun
32 °
Mon
33 °
Tue
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!