9.1 C
New Delhi
Monday, December 1, 2025
Homeमहाराष्ट्रइंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान खजिनदार पदी विरबाला पाटील यांची निवड

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान खजिनदार पदी विरबाला पाटील यांची निवड

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखर ता इंदापूर संस्थेचे खजिनदार पदी विरबाला धैर्यशील पाटील यांची निवड झाली.संस्थेच्या सभेत वीरबाला धैर्यशील पाटील यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी दिली.इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय विश्वासराव दादा रणसिंग व स्वर्गीय अण्णासाहेब हेगडे यांनी सन १९७९ साली इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलींसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण व्हावी यासाठी कळंब या ठिकाणी महाविद्यालय सुरु केले. प्रतिष्ठानने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अफार्म या संस्थेच्या माध्यमातून विविध योजनेचा लाभ देण्यासाठी कार्य केले. संस्थेचे माध्यमिक विद्यालय तावशी व माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी या ठिकाणी शैक्षणिक संकुल कार्यरत असून हजारो विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत.स्वर्गीय विश्वासराव दादा रणसिंग यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा व शेतकऱ्यांना उपक्रमशील शेती करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून पाठबळ दिले. खजिनदार निवड झाल्यानंतर विरबाला पाटील यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शैक्षणिक कार्यात सहभागी होवून स्वर्गीय विश्वास दादा रणसिंग यांच्या विचाराचा वारसा जतन करणार असल्याचे तसेच शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.वीरबाला धैर्यशील पाटील यांची खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम,सचिव वीरसिंह रणसिंग ,विश्वस्त शंकरराव रणसिंग,विश्वस्त कुलदीप हेगडे,विश्वस्त शिवाजीराव रणवरे,विश्वस्त राही रणसिंग, कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग,माध्यमिक विद्यालय तावशीचे मुख्याध्यापक महादेव बागल,माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद भोंग यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
9.1 ° C
9.1 °
9.1 °
87 %
1kmh
0 %
Mon
24 °
Tue
25 °
Wed
24 °
Thu
24 °
Fri
23 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!