विरळ होत असलेली नाती, सामाजिक बांधिलकी यांचा विचार करुन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कोथरूड शाखेच्या वतीने, 19 ऑक्टोबर रोजी सकाळी थोरात उद्यानात दिवाळी फराळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उद्देश एकच की, कार्यक्रमाद्वारे सामाजिक नाती घट्ट करून संघटन वाढवणे.

प्रसिद्ध कवी मिलिंद जोशी, सरिता कुलकर्णी यांनी खास आपल्या शैलीत कविता सादर केल्या, चंद्रशेखर देशपांडे, नवोदित गायिका रिचा देशपांडे यांनी सुमधुर गाणी म्हणुन मैफिल जमवली.
कविता फडके यांनी सूत्रसंचालन करत वैवाहिक नाते अधिक घट्ट होण्यासाठी काही खेळ घेतले व कार्यक्रमात रंगत आणली.
उल्लेखनीय बाब म्हणजे सर्वांनी बागेतील पालिकेच्या कर्मचाऱ्यांसमवेत फराळ व मिसळीचा आस्वाद घेतला.
अनेक नवीन सभासद जोडले गेले, पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष केतकी कुलकर्णी आवर्जून उपस्थित होते.

या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन शाखा अध्यक्ष अनिरुद्ध पळशीकर, जयश्री घाटे, सुरेश कुलकर्णी, यामिनी मठकरी या पदाधिकार्यांनी केले.