इंदापूर – इंदापूर तालुक्यातील पारेकरवस्ती (वनगळी) शाळेतील शिक्षक संतोष घोडके व सविता पवार यांची जिल्हा अंतर्गत बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभाचा व शाळेत नव्याने बदली होऊन आलेल्या शिक्षिका शोभा गनगले व यास्मिन नदाफ यांच्या स्वागताचा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ पारेकरवस्ती यांनी आयोजित केला होता.यावेळी सत्कार समारंभात बोलताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमोल भिसे म्हणाले, जिल्हा परिषद शाळा ह्या ग्रामीण भागातील शिक्षणाचा मुख्य कणा आहेत. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गुणवंत व कार्यक्षम असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना मंथन, प्रज्ञाशोध, सामान्यज्ञान व इतर विविध स्पर्धा परीक्षांना बसवून राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळविले आहे. गावातील पालकांचा लोकसहभाग घेऊन शाळा डिजीटल केली असून शाळेला आकर्षक रंगरंगोटी केली आहे. विद्यार्थ्यांसाठी लोकवर्गणीतून शाळेसाठी आवश्यक भौतिक सुविधा निर्माण केल्याबदल पालकांचे आभार मानले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या नंदा पारेकर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रुपाली पारेकर, , मा.उपसरपंच पांडुरंग पारेकर, यशवंत पारेकर,माणिकराव पाटील, सुदाम पारेकर, सुरेश भिसे, पत्रकार दत्ता पारेकर, हनुमंत तुपे, दत्तात्रय कामटे, कमलाकर पारेकर, शिवाजी बोडके, मोहन पवार दत्तात्रय, गणगले, नाशिर शेख , सुनिता पारेकर कलावती पारेकर, द्रोपदा पारेकर, जयश्री पारेकर , संगीता भिसे यांच्यासह पालकवर्ग, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ॲड.अनिल पारेकर यांनी केले; तर आभार समाधान पारेकर मानले.


