मंचर : धामणी (तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान परिसरात भाविकांच्या पिण्याचे पाण्याच्या सुविधेसाठी लोकवर्गणीतून रुपये अकरा लाख खर्च करुन चाळीस हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ( पाण्याची टाकी)बांधण्यात आलेली असल्याचे ग्रामस्थ व सेवेकरी मंडळीनी सांगितले धामणी येथील हे खंडोबा देवस्थान पुणे.नगर.नाशिक व मुंबई जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असून माघ पोर्णिमेच्या यात्रेला तळीभंडार व दर्शनासाठी देवकार्यासाठी हजारो भाविक सहकुटुंब येतात.यात्रेच्या तीन दिवस कालावधीत भाविकांचा देवस्थान परिसरात मुक्काम असतो.गेल्या काही वर्षात धामणीच्या यात्रेला हजारो भाविक श्रध्देने मुक्कामी येतात.

वाढत असलेल्या भाविकांच्या संख्येमुळे त्यांना वापरण्यासाठी पाण्याचा पुरवठा करणार्या दोन पाण्याच्या टाक्या अपुर्या पडू लागल्यामुळे भाविक मंडळीनी लोकवर्गणीतून नवीन मोठी पाण्याची अद्ययावत टाकी बांधण्याची मागणी मागील वर्षीच्या(फेब्रुवारी २०२५) यात्रेत देवस्थानाकडे केलेली होती. देवस्थानाने रुपये अकरा लाख लोकवर्गणीतून जमा करुन जलकुंभाचे काम पूर्ण केलेले असून येणार्या माघ पौर्णिमेच्या यात्रेच्या कालावधीत (१ फेब्रुवारी २६ ते ३ फेब्रुवारी२६)भाविकांना शुध्द पिण्याचे पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे ग्रामस्थ व सेवेकर्यांनी सांगितले पुढील कालावधीत भाविकांच्या सोईसाठी लोकवर्गणीतून अन्य विकास कामे करणार असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.


