पुणे : मराठा उद्योजकांना येणाऱ्या समस्या तसेच मराठा उद्योजकांच्या एकत्रिकीकरणासाठी पुण्यात शनिवारी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर विकास आणि संशोधन संस्था एमआयडीसी येथे पुणे जिल्हा मराठा उद्योजक कक्षातर्फे विविध मार्गदर्शानात्मक चर्चसत्रांचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रामुख्याने तरुण उद्योजकांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींसाठी पॅनल चर्चेचे आयोजीत करण्यात आली होती. जागतिकीकरणामुळे आज अनेक नवीन प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या पॅनल चर्चा स्तरातून उद्योजकांना व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी पाठबळ मिळाले.उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या, उद्योगांमधील नाविन्यता, बदलते तंत्रज्ञान, नेटवर्किंगच्या संधी अशा विविध विषयांचे महत्व या चर्चासत्रात अधोरेखित करण्यात आले.
सदरील कार्यक्रम भारत विकास ग्रुप ( बीव्हीजी )BVG ind. ltd इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष शिवश्री हणमंतराव गायकवाड ह्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रसंगी एस. व्ही. ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक शिवश्री डॉ. मनोज कदम प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री. राजेंद्रसिंह पाटील व मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे महासचिव शिवश्री संजय वायाळ पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच काटे फूड्सचे शिवश्री रमेश काटे, बीव्हीजी ग्रुपचे शिवश्री रवी घाटे, बीव्हीजी ग्रुपचे शिवश्री विजयकुमार चोले आणि भारत ट्रेडर्स चे अर्जुन खामकर उपस्थित होते.
एस. व्ही. ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक शिवश्री डॉ. मनोज कदम म्हणाले की उद्योजकांचे मूळ चांगले असेल तर तो उद्योजक जगपातळीवर राज्य करू शकतात. आजच्या तरुण उद्योजकांकडे नवनवीन चांगल्या संकल्पना आहेत, उद्योग विस्तारीकरणासाठी धडपड चालू आहे. अशा तरुणांना योग्य पद्धतीचे मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच ते यशस्वी होतील. मराठा समाजामध्ये उद्योजकांची संख्या वाढणे ही काळाची गरज आहे. यातून ऊच्चशिक्षित सुजाण तरुण समाजामध्ये घडतील.
मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे महासचिव शिवश्री संजय वायाळ पाटील म्हणाले की , “अशा स्वरूपाच्या चर्चासत्रांमधून उद्योजकांना एक नवी दिशा मिळून त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यास नक्कीच मदत होईल. तसेच आम्ही दर महिन्याला माहितीपूर्ण व मार्गदर्शनात्मक चर्चासत्रांचे आयोजन करून उद्योगांना चालना देण्यास आम्ही प्रयत्नशील राहू”.
मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री. राजेंद्रसिंह पाटील म्हणाले की ” शेतकऱ्यांची मुले उद्योग व्यसायाकडे वळली पाहिजेत, तसेच मराठी उद्योजकांचे जागतिक पातळीवर व्यवसाय विस्तारीकारण व्हावे यासाठी मराठा उद्योजक कक्ष गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.आज या चर्चासत्रामध्ये जागतिक पातळीवरील उद्योगांच्या संधी यावर विशेष चर्चा करण्यात आली . मला आशा आहे या मधून उद्योजक आपला व्यवसाय वृद्धिंगत करतील”.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवश्री शंकर मांजरे, गौरी माने, शिवश्री सुरेश वाळुंज, शैलेश आढाव, महेश अंबड, मुकेश पाटील, बालाजी चव्हाण, अभिजित घाटगे, डॉ. सोमनाथ शिनगारे, बाळासाहेब कोबल, दादा भापकर, सुनील पाटील, राजेश साखरे, महेन्द्र गुंड, डॉ आशा कर्भारी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन दीपाली बाज़ी, राजेंद्र बाज़ी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवश्री जिल्हा अध्यक्ष अर्जुन खामकर, आभार शिवश्री रोहित जगताप यांनी मानले.