26 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानएमआयटी डब्ल्यूपीयूत ‘उद्यमोत्सव’ १६ जानेवारी रोजी

एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘उद्यमोत्सव’ १६ जानेवारी रोजी

राष्ट्रीय स्टार्टअप दिनाचा भव्य उत्सव

पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल आणि एआयसीटीई यांच्यातर्फे आयोजित ‘उद्योमोत्सव २०२५’ ची घोषणा करण्यात आली आहे. या उत्सवाचे उद्घाटन १६ जानेवारी २०२५ रोजी कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या कॅम्पस मध्ये सकाळी ९.३० वा. होणार आहे. अशी माहिती एमआयटी टीबीआयचे संचालक व माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे व एमआयटी टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटरचे सीईओ निनाद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकारच्या शार्क टँकच्या धर्तीवर आधारित ‘उद्योमोत्सव २०२५’ हा विद्यार्थी व उद्योजकांना गुंतवणुकदार समुदायाशी जोडण्यासाठी तयार करण्यात आलेला पहिलाच प्लॅटफॉर्म आहे. शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल आणि एआयसीटीई द्वारे आयोजित हा कार्यक्रम शैक्षणिक संस्थामधून आणि भारतातील इनक्युबेशन सेंटर्समधून निर्माण होणार्‍या स्टार्ट अप्सचा सन्मान आणि प्रोत्साहन करतो. याचा मुख्य उद्देश्य स्टार्टअप्सला त्यांच्या कल्पना गुंतवणूकदारांसमोर मांडणे, निधी मिळविणे आणि रणनीतिक भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी संधी उपलब्ध करूण देणार आहे.
‘उद्योमोत्सव २०२५’ ची प्रमुख विशेषता म्हणजे हा गुंतवणूकदार स्टार्टअप्स मध्ये संवाद घडवून आणतो. स्टार्टअप्सना त्यांचे नवोन्मेष सादर करण्याची, त्यांच्या कल्पना मांडण्याची आणि विविध उद्योगातील प्रमुख गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. ज्यामुळे नवीन सहकार्य आणि प्रगती साधली जाईल.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित ‘उद्योमोत्सव २०२५’ कार्यक्रमात डॉ. प्रदीप ढगे, जीतो चे भारत ओसवाल, सीए निनाद दाते, राईस कॅपिटलचे संस्थापक व सीईओ जितेन्द्र सपकाळ, जिडी चितळे व्हेंचर लि. श्री. चितळे यांच्यासह अन्य मान्यवर विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
हा कार्यक्रम ११ राज्यांतील,१३ शहरांतील आणि १४ प्रमुख संस्थांतील गुंतवणूकदार आणि स्टार्टअप्स यांच्यात संवाद साधण्यासाठी संधी निर्माण केले जाणार आहे. त्यामुळे देशव्यापी नवोन्मेष आणि संधीचे जाळे तयार होईल.

उद्यमोत्सव २०२५ हे भारतभरातील १४ ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. ज्यामध्ये अहमदाबाद, दिल्ली एनसीआर, जयपूर, बंगळूर, हैदराबाद, पुणे, चेन्नई, श्रीनगर, कोयंबटूर, नागपूर, लखनऊ, चंदीगड, तिरूवनंतपुरम आणि गुवाहाटी यांचा समावेश आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत जीतो इन्क्यूबेशन अँड इनूोव्हेशन फाउंडेशनचे भरत ओसवाल आणि सेंटर फॉर बिझनेस इनोव्हेशन अ‍ॅण्ड एंटरप्रेन्युअरशिपचे सहाय्यक संचालक – स्टार्टअप अ‍ॅक्सेलेटर प्रशांत अय्यर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
26 ° C
26 °
26 °
93 %
3.9kmh
100 %
Mon
31 °
Tue
34 °
Wed
36 °
Thu
33 °
Fri
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!