पुणे-
इलेक्ट्रिक सायकल उत्पादक कंपनी ईमोटोरॅड भारतातील सर्वात मोठी गिगाफॅक्टरी उभारत आहे. पुण्याजवळील रावेत येथे हा कारखाना उभा केला जात असून त्याचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याने पुण्यातील स्टार्टअप्स ईमोटोरॅड मध्ये गुंतवणूक केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.ई-सायकल गीगाफॅक्टरी चार टप्प्यात पूर्ण होईल. पहिल्या टप्प्याचे काम सुरु आहे. हा टप्पा पूर्ण होताच दक्षिण आशियात पुणे येथे ही सर्वात मोठी ई-सायकल गीगाफॅक्टरी ठरेल. चीनला पण आपण मागे टाकू. या ऑगस्ट 2024 पासून पहिला टप्पा सुरु होत आहे. त्याची तयारी सुरु आहे. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने गेल्या महिन्यात इमोटोराड या इलेक्ट्रिक सायकल उत्पादक कंपनीत गुंतवणूक केली होती. मात्र, त्याने या ई-सायकल कंपनीत किती गुंतवणूक केली हे अद्याप कळू शकलेले नाही. महेंद्रसिंग धोनी किंवा कंपनीने गुंतवणुकीच्या रकमेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.राजीव गंगोपाध्याय, कुणाल गुप्ता, आदित्य ओझा आणि सुमेध बट्टेवार यांनी 2020 मध्ये ईमोटोरॅडची स्थापना केली होती, ज्याचा उद्देश साहसी लोक तसेच दैनंदिन प्रवासी इत्यादींना परवडणाऱ्या किमतीत इको-फ्रेंडली, भविष्यकालीन ई-बाईक प्रदान करणे हा आहे.रावेत येथे असलेला ईमोटोरॅडचा उत्पादन कारखाना 2 लाख 40 हजार चौरस फुटांमध्ये पसरलेला असेल. 15 ऑगस्टपासून या प्लांटचे कामकाज अधिकृतपणे सुरू होणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ऑपरेशन सुरू झाल्यानंतर या प्लांटमध्ये 5 लाख इलेक्ट्रिक सायकली तयार करण्याची क्षमता असेल. प्लांट चालवण्यासाठी कंपनी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करणार आहे. सध्या कंपनीत 250 कर्मचारी आहेत. कंपनी 300 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याच्या योजनेवर काम करत आहे.