स्मॉल, मिड कॅपमध्ये मूल्यांकन उच्च पातळीवर असताना, डीएसपी म्युच्यूअल फंडातर्फे निफ्टी टॉप टेन इक्वल वेट इंडेक्सवर आधारित भारतातील पहिला फंड
पुणे : DSP म्युच्युअल फंडने भारतातील पहिला निफ्टी टॉप 10 इक्वल वेट इंडेक्स फंड आणि ईटीएफ लॉन्च केला आहे, जो निफ्टीमधील फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर टॉप 10 भारतीय कंपन्यांमध्ये समान प्रमाणात गुंतवणूक करतो. DSP निफ्टी टॉप 10 इक्वल वेट इंडेक्स फंड आणि DSP निफ्टी टॉप 10 इक्वल वेट ईटीएफचा उद्देश पि/ई रेशियो, रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन अस्टेस सारख्या मेट्रिक्सच्या आधारे निफ्टी 50 आणि निफ्टी 500 च्या तुलनेत टॉप 10 स्टॉक्सच्या तुलनात्मकरीत्या चांगल्या मूल्यांकनाचा फायदा घेणे आहे.
विविध कालावधीत बदललेल्या मूल्यांकनाआधारे तसेच दीर्घ कालावधीत निफ्टी टॉप टेन इक्वल वेटेज निर्देशांकाने निफ्टी फिफ्टी आणि निफ्टी 500 या दोन निर्देशांकाच्या तुलनेत सरस कामगिरी बजावलेली आहे. मागील सोळापकी नऊ वर्षांत निफ्टी टॉप टेन इक्वल वेटेज निर्देशांकाने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. एकूण बाजारमूल्याच्या टक्केवारीच्या तुलनेत आघाडीच्या दहा समभागांचा अधिभार हा सर्वकालीन निच्चांकी पातळीवर असल्याने सध्या आघाडीच्या दहा कंपन्या या योग्य मूल्यांकन पातळीवर आहेत. बाजारातील अन्य निर्देशांकाच्या तुलनेत आघाडीच्या दहा समभागांची कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. परंतु आकडेवारी* असे दशवितो की, तीन वर्षासाठीचा ऐतिहासिक अल्फा गुणोत्तर ज्यावेळी उणे पातळीवर असतो, त्यावेळी निफ्टी टॉप टेन इक्वल वेट इंडेक्ससाठी आगामी काळातील अल्फा गुणोत्तर हे धन पातळीवर असते. यातून या समभागांच्या मूल्याकंनात वाढीचे स्पष्ट संकेत मिळतात.
पोर्टफोलिओच्या गुणवत्तेनुसार, निफ्टी 500 इंडेक्सच्या तुलनेत निफ्टी टॉप टेन इक्वल वेटेज इंडेक्समधील समभागांवर दीड पट अधिक परतावा मिळालेला आहे**. वित्तीय वर्ष 2024 च्या आकडेवारीनुसार निफ्टी फिफ्टीचा सुमारे 49 टक्के नफा हा निफ्टी टॉप टेन इक्वल वेट इंडेक्सच्या समभागांनी मिळवून दिलेला आहे.
डिएसपी निफ्टी टॉप टेन इक्वल वेट इंडेक्स फंड आणि डिएसपी निफ्टी टॉप टेन इक्वल वेट इंडेक्स इटीएफ हे दोन फंड प्राथमिक गुंतवणूकीसाठी येत्या 16 ऑगस्ट 2024 ला खुले होणार असून येत्या 30 ऑगस्ट 2024 ला बंद होणार आहेत.