27.3 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानपँटालून्सने एसजीएस मॉलमध्ये नवीन स्टोअरचे अभिनेत्री श्रिया पिळगावकर यांच्या हस्ते केले उद्घाटन

पँटालून्सने एसजीएस मॉलमध्ये नवीन स्टोअरचे अभिनेत्री श्रिया पिळगावकर यांच्या हस्ते केले उद्घाटन

आधुनिक काळातील खरेदीदारांसाठी सुधारण्‍यात आलेला आकर्षक नवीन फॅशन अनुभव

पुणे, -: पॅण्‍टालून्‍स या आदित्‍य बिर्ला फॅशन अँड रिटेल लि.च्‍या भारतातील आघाडीच्‍या फॅशन रिटेलरने पुण्‍यातील एसजीएस मॉल येथे नवीन रूपांतरित केलेले स्‍टोअर लाँच केले आहे. भारतातील प्रख्‍यात अभिनेत्री श्रीया पिळगावकर यांच्‍या हस्‍ते या सुधारित स्‍टोअरचे उद्घाटन करण्‍यात आले, जेथे भव्‍य सेलिब्रेशनमध्‍ये स्‍टार पॉवर दिसण्‍यात आली. १९३५० चौरस फूट जागेवर पसरलेल्‍या या स्‍टोअरमध्‍ये समकालीन लेआऊटसह एैसपैस जागा, लक्षवेधक डिस्‍प्‍ले आणि सुधारित डिझाइन आहे, ज्‍यामधून उत्‍साहवर्धक शॉपिंग अनुभव मिळतो.

देशभरातील निवडक स्‍टोअर्समध्‍ये राबवण्‍यात येणाऱ्या ब्रँडच्‍या मोठ्या सुधारणा उपक्रमाचा भाग म्‍हणून हे उत्‍साहवर्धक परिवर्तन करण्‍यात आलेले पुण्‍यातील पहिले पॅण्‍टालून स्‍टोअर आहे. नवीन रुप घेतलेले स्‍टोअर खरेदीदारांना फॅशनचा शोध घेण्‍यास आणि एकाच ठिकणी सर्व उत्‍पादने मिळण्‍यास मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, ज्‍यामध्‍ये आधुनिक ट्रेण्डिंग रनवेपासून अॅक्‍सेसरीज, कलर कॉस्‍मेटिक्‍स व फ्रॅग्रन्‍सेसचा समावेश आहे.

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत पॅण्टालून्‍स व स्‍टाइल अपच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी संगीता तनवानी म्‍हणाल्‍या, ”आम्‍हाला पुण्‍यातील ग्राहकांसाठी सुधारित शॉपिंग अनुभव सादर करताना आनंद होत आहे. या भव्‍य पुनर्उद्घाटनामधून ग्राहकांना उत्‍साहित व स्‍टायलिश फॅशन देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, जे प्रेरणादायी व सर्वसमावेशक आहे. पॅण्‍टालून्‍ससाठी आमचा शहरातील फॅशनप्रेमी ग्राहकांसाठी स्‍टायलिंग गंतव्‍य असण्‍याचा दृष्टिकोन आहे.”

या रिलाँचला साजरे करण्‍यासाठी पॅण्‍टालून्‍सने स्‍पेशल इन-स्‍टोअर अनुभव डिझाइन केला, ज्‍यामध्‍ये श्रीया पिळगावकर यांचा समावेश होता, ज्‍या विशेष शहरनिहाय थीमवर आधारित स्‍टायलिंग परस्‍परसंवादामध्‍ये सामील झाल्‍या आणि ग्राहक व मीडियासोबत भेटीगाठी केल्‍या. ‘सिटी-इन्‍स्‍पायर्ड लुक्‍स’ थीम असलेल्‍या या एक्टिव्हीटीजनी पुण्‍यातील विशिष्‍ट शहरी शैलीतील संवदेनशीलतेला प्रकाशझोतात आणले, जेथे अतिथींना शहरातील उत्‍साही वातावरणाचा प्रेरणादायी अनुभव मिळाला.

फॅशन उद्योगामध्‍ये २७ हून अधिक उल्‍लेखनीय वर्षे कार्यरत राहत पॅण्‍टालून्‍स आपल्‍या नवीन, उत्‍साहित व सर्वसमावेशक स्‍टोअर्सच्‍या माध्‍यमातून शॉपिंग अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहे.

एसजीएस मॉल, पुणे येथे धोरणात्‍मकरित्‍या स्थित हे स्‍टोअर पुरूष, महिला व लहान मुलांसाठी सर्वसमावेशक वॉर्डरोब कलेक्‍शन देते, ज्‍यामध्‍ये दैनंदिन आवश्‍यक वेअरपासून वेस्‍टर्न, एथनिक, वर्कवेअर व कॅज्‍युअल कलेक्‍शन्‍समधील वेअरचा समावेश आहे. एसजीएस मॉल येथील बहुप्रतिक्षित पॅण्‍टालून्‍स स्‍टोअर आता खुले आहे. आधुनिक ट्रेण्‍ड्सना एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍यासाठी आणि अभूतपूर्व फॅशनचा अनुभव घेण्‍यासाठी आजच स्‍टोअरला भेट द्या!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
27.3 ° C
27.3 °
27.3 °
88 %
3.7kmh
100 %
Mon
27 °
Tue
35 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!