विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजन
पुणे : विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने ‘आर्किटेक्चरल कोशंट’ आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वास्तुकला विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सोमवार दिनांक ५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता नवी पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदा बारावे वर्ष आहे.
पुण्यातील आर्किटेक्चरच्या विविध महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. विजेत्या संघासाठी प्रमाणपत्रे आणि १२ हजार रुपये, प्रथम उपविजेत्या संघासाठी ८ हजार रुपये आणि द्वितीय उपविजेत्या संघांना ६ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत शेवटच्या तीन संघांसाठी २ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक तसेच प्रश्नमंजुषेत जास्तीत जास्त संघांचा सहभाग असलेल्या महाविद्यालयांसाठी ट्रॉफी देखील देण्यात येणार आहे.
विवेकानंद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, विश्वस्त आणि सचिव जितेंद्र पितलीया, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसन्न देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा होत आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, वस्तूकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, प्रा. देवेंद्र देशपांडे – ९४२३५८५२७६, , प्रा. हर्षवर्धन वाकोडे – ९०९६१८६७८८ या क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.