• मॅग्मा एचडीआयतर्फे तयार करण्यात आलेल्या ग्राहक अनुकूल विमा पर्यायाव्दारे महिंद्र फायनान्सच्या ग्राहकांची आर्थिक सुरक्षा वाढवण्यासाठी भागीदारी
• नाविन्यपूर्ण सामान्य विमा योजना प्रदान करण्यासाठी भागीदारी
पुणे : भारताच्या सामान्य विमा क्षेत्रात अतिशय वेगाने विस्तार करत चाललेल्या मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्स कंपनीने महिंद्रा फायनान्स या देशातील आघाडीच्या एनबीएफसी वित्तकंपनीबरोबर कॉर्पोरेट एजन्सीसाठी करार केला आहे. या करारातर्गत महिंद्रा फायनान्सच्या ग्राहकांना मोटर तसेच बिगर मोटर विभागात, विविध सामान्य विमा पर्यायांसह विविध विमा योजना मॅग्मा एचडीआय उपलब्ध करणार आहे.
या करारावर महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राऊल रिबेलो आणि मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राजीव कुमारस्वामी यांनी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली.
महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राऊल रिबेलो याप्रसंगी बोलताना म्हणाले, “आमच्या ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार सामान्य विमा कवच प्रदान करण्यासाठी मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्ससोबत ही भागीदारी करताना आम्ही अतिशय उल्लसित आहोत. कंपन्यांचे हे धोरणात्मक सहकार्य उदयोन्मुख भारतासाठी नानाविध आर्थिक पर्याय सादर करण्याकरिता एक जबाबदार भागीदार बनण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्याचबरोबर या भागीदारीमुळे सतत वाढणारे विमा क्षेत्र अधिक खोलवर विस्तारणार आहे.”
मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राजीव कुमारस्वामी याप्रसंगी म्हणाले, ” ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ या उद्योगाच्या संकल्पनेला आणखी पुढे नेण्याकरिता अर्थप्रणालीला एकत्र आणणे गरजेचे असून त्या दृष्टीकोनातून महिंद्रा फायनान्ससोबतची आमची भागीदारी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ग्राहकांच्या गरजेनुरूप विमा योजनांचे पर्याय सादर करत आम्ही आमच्या ग्राहकांची आर्थिक सुरक्षितता बळकट करण्याबरोबरच जीवनातील अनिश्चिततेतही वाटचाल करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली मनःशांती प्रदान करणार आहोत.”