पुणे : रॉयल एनफिल्ड ही मध्यम आकाराच्या (२५०-७५० सीसी) मोटरसायकल विभागामधील जागतिक अग्रणी कंपनी पश्चिम प्रांतामध्ये आपल्या एक्सक्लुसिव्ह अॅपरल ब्रँड स्टोअरच्या लाँचसह मोठा टप्पा साजरा करत आहे. पुण्यातील हडपसर येथील अमनोरा मॉलमध्ये स्थित हे नवीन स्टोअर मोटरसायकलिंग समुदाय व जीवनशैलीप्रेमींसाठी उत्साहवर्धक भर आहे, ज्यामधून उच्च दर्जाचे राइडिंग गिअर, लाइफस्टाइल अॅपरल आणि अॅक्सेसरीज प्रदान करण्याप्रती ब्रँडची कटिबद्धता दिसून येते.
हे स्टोअर राइडिंग गिअर व्यतिरिक्त सर्वोत्तम शॉपिंग अनुभव देते. या स्टोअरमधून रॉयल एनफिल्डची प्रीमियम, उद्देश केंद्रित उत्पादनांप्रती कटिबद्धता दिसून येते, ज्यामध्ये सुरक्षितता, आरामदायीपणा व स्टाइल सामावलेली आहे. निर्विक व्ही२, क्रॉसरोडर आणि स्ट्रीटविंड इको सारख्या राइडिंग जॅकेट्सच्या व्यापक श्रेणी व्यतिरिक्त स्टोअरमध्ये हेलमेट्स, मेन्स व विमेन्स लाइफस्टाइल अॅपरलच्या व्यापक कलेक्शनसह शर्ट्स, टी-शर्ट्स, ट्राऊझर्स, बॅग्ज व शूजचा समावेश आहे. शहरामधून प्रवास करायचा असो किंवा शिखरांवर ऑफ-रोड राइडिंगचा किंवा महामार्गावर क्रूझिंगचा आनंद घ्यायचा असो हे स्टोअर प्रत्येक राइडचा मूड आणि प्रवासासंबंधित गरजांची पूर्तता करते.
या स्टोअरच्या लाँचप्रसंगी मत व्यक्त करत रॉयल एनफिल्डचे चीफ कमर्शियल ऑफिसर यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ”पुणे वैविध्यपूर्ण मोटरसायकलिंग संस्कृती असलेले भारतातील अव्वल शहर आहे. पुण्यामध्ये आमच्या एक्सक्लुसिव्ह अॅपरल स्टोअरच्या लाँचसह आम्ही अधिक उपलब्धतेसह उच्च दर्जाचे राइडिंग गिअर आणि लाइफस्टाइल अॅपरल देण्यासाठी आमची रिटेल फूटप्रिंट वाढवत आहोत. हे नवीन स्टोअर अपवादात्मक आरामदायीपणा, अनुकूलता व संरक्षणासाठी डिझाइन करण्यात आलेल्या वैविध्यपूर्ण उत्पादनांप्रती समर्पित आहे. आम्ही आमच्या मोटरसायकलिंग समुदायाला पाठिंबा देण्याप्रती कटिबद्ध आहोत, तसेच ते सुरक्षित, कार्यक्षम व स्टायलिश राइड गिअरसह कोणत्याही साहसी राइडसाठी सुसज्ज असण्याची खात्री घेतो.”
रॉयल एनफिल्ड आपल्या एक्सक्लुसिव्ह अॅपरल ब्रँड स्टोअरच्या लाँचला साजरे करत असताना आपल्या अॅपरल व्यवसायाच्या रिटेल प्रवासाच्या उत्साहवर्धक नवीन टप्प्यामध्ये देखील प्रवेश करत आहे. रॉयल एनफिल्ड शॉपिंग अनुभव अधिक उत्साहवर्धक करण्यास सज्ज आहे आणि प्रत्येक राइडरच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात येणारी उच्च दर्जाची उत्पादने वितरित करत आहे. ग्राहकांना या नवीन स्टोअरमधील वैविध्यपूर्ण ऑफरिंग्जना एक्स्प्लोअर करण्याचे आणि भावी ओपनिंग्जसाठी कंपनीशी संलग्न राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे, ज्यामुळे त्यांचा ‘प्युअर मोटरसायकलिंग’ अनुभव अधिक उत्साहपूर्ण होईल.