पुणे : विश्वकर्मा विद्यापीठ पुणे सादर करत असलेली शाळा आणि ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आयोजित भारतातील सर्वात मोठी रोबोटिक्स स्पर्धा ‘फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप २०२४-२५’ श्री शिव छत्रपती क्रीडांगण पुणे येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे. आज या स्पर्धेत पुणे महापालिकेच्या विद्यायनिकेतन शाळांमधील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स विश्वाचा अनोखा अनुभव घेतला.

फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप २०२४ =२५ या स्पर्धेती भारतातील विविध ६० शहरांसाह कझाकस्तान, श्रीलंका, युएई येथून ६ आंतरराष्ट्रीय संघ सहभागी झाले आहेत. या रोबोटिक्स स्पर्धेचे अनोखे विश्व जाणून घेण्यासाठी पुणे महापालिकेच्या विद्य निकेतन शाळांमधील सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना आज शिक्षकांच्या सोबत या चॅम्पियनशिप अनुभवण्याची अनोखी संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी लाईव्ह रोबोटिक्स मॅचेस पाहिल्या, जिथे देशभरातील टॉप टीम्स उच्च-ऊर्जा, धोरणात्मक खेळांमध्ये प्रतिस्पर्धा करत होत्या.

धमाकेदार मॅचेसशिवाय, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या टीम्सद्वारे विविध नवकल्पनांचे प्रदर्शन पाहिले. यामुळे त्यांना रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि समस्यांच्या सोडवणुकीच्या तंत्रज्ञानांची माहिती मिळाली. तंत्रज्ञानातील कौशल्य, टीमवर्क आणि सर्जनशीलतेने प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स आणि STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) क्षेत्रांबद्दल उत्साह व्यक्त केला. यामुळे भविष्यातील करियरच्या दृष्टीने त्यांना एक नवा प्रेरणा मिळाला.
सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आरामदायक आणि आनंददायी अनुभव देण्यासाठी ICIT, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) यांच्या सौजन्याने रिफ्रेशमेंट उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थ्यांनी चॅम्पियनशिपमध्ये वेळ घालवला आणि हा कार्यक्रम केवळ शैक्षणिकच नाही तर प्रेरणादायी आणि आकर्षक ठरला.
फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप हा एक अभिनव मंच ठरला आहे, ज्यामुळे युवा मनांना रोबोटिक्स आणि नवकल्पनांच्या जगात प्रवेश मिळतो आणि भविष्यातील तंत्रज्ञ नेतृत्व तयार होईल. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यासह विविध संस्था कार्यरत आहेत.