पुणे : स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SCHIL) या IFCI लिमिटेडच्या सहयोगी कंपनीने श्री अतुल सक्सेना यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले.
श्री. सक्सेना यांच्या कडे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानातील सल्लामसलतीसह कॉर्पोरेट फायनान्स आणि भांडवली बाजारपेठेचा २५ हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण कौशल्यांसह क्रेडिट आणि रिकव्हरी, कॉर्पोरेट प्लानिंग, संचालक मंडळासाठीचे सचिव, अंतर्गत लेखा परिक्षण या क्षेत्रातील अनुभवाचा लाभ कंपनीला होणार आहे. IFCI लिमिटेड मधील त्यांच्या करियर मध्ये त्यांनी कंपनीच्या संरचनात्मक आणि कार्यात्मक प्रगतीचा आलेख दशकभरापेक्षा अधिक कालावधीत चढता ठेवला आहे.
या आधीच्या IFCI इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड च्या व्यवस्थपकीय संचालक पदी असतांना श्री सक्सेना यांनी कंपनीला कोविड १९ च्या आव्हानात्मक परिस्थितीतही स्थीर ठेवले. नुकताच त्यांनी IFCI लिमिटेड च्या प्रिन्सिपल ऑफिसर्स म्हणून काम पाहिले त्यासह त्यांनी चीफ जनरल मॅनेजर म्हणून काम पाहिले तसेच कंपनीच्या वित्तीय आणि कार्याशी संबंधित उपक्रमाचे ही नेतृत्व केले.
श्री. सक्सेना यांच्याकडे संचालक मंडळावर काम करण्याचाही समृध्द अनुभव आहे, त्यांनी गेल्या दशकभरापासून विविध कंपन्यांच्या नॉमिनी आणि नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांचा कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि धोरणात्मक नियोजनातील व्यापक समज या भूमिकांमध्ये मौल्यवान ठरला आहे.
IFCI मधील आपल्या कारकिर्दी पूर्वी श्री. सक्सेना हे इंजिनियर्स इंडिया लिमिटेड आणि PWC मध्ये कार्यरत होते व त्यांनी इंजिनियरींग आणि सल्लामसलत क्षेत्रात आपली कुशलता प्रदर्शित केली आहे. त्यांच्याकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर येथून सिव्हिल इंजिनियरींग ची पदवी असून त्यांनी कलकत्ता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट पूर्ण केले आहे.
या नियुक्ती बद्दल बोलतांना श्री. अतुल सक्सेना यांनी सांगितले “ स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून कामाची सुरुवात करतांना मी खूपच उत्साही आहे. मला आशा आहे की स्टॉकहोल्डिंग मधील कुशल टीम बरोबर काम करतांना आम्ही कंपनीचा पाया मजबूत करुन वाढ आणि नाविन्यामुळे सुरु असलेली प्रगती वाढवू शकू. आम्ही एकत्र येऊन आमच्या सर्व महत्त्वपूर्ण घटकांसाठी अजोड मुल्य देऊन आमच्या क्षेत्रात नवीन माइलस्टोन प्रस्थापित करु शकू.”