30.1 C
New Delhi
Wednesday, March 18, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानबाजारपेठेतील अनिश्चित स्थितींमध्‍ये गुंतवणुकीचे रिबॅलन्सिंग नवीन संधी निर्माण करू शकते

बाजारपेठेतील अनिश्चित स्थितींमध्‍ये गुंतवणुकीचे रिबॅलन्सिंग नवीन संधी निर्माण करू शकते

एएमएफआय प्रमाणित म्‍युच्‍युअल फंड वितरक मनोज मुनोत यांचे मत

  • pune |
  • जगभरातील बाजारपेठा नवीन वास्तवाशी जुळवून घेत आहेत. व्याजदर प्रमुख अस्थिर बाब असताना भू-राजकीय तणाव जागतिक व्यापारावर प्रभाव टाकत आहेत आणि प्रमुख क्षेत्रांमधील आर्थिक चक्र वेगवेगळ्या वेगाने पुढे जात आहेत. अशा वातावरणात गुंतवणूकदारांनी आपल्‍या गुंतवणूक वितरणाचे विचारपूर्वक पुन्‍हा मूल्‍यांकन केले पाहिजे.

पोर्टफोलिओचे रिबॅलन्सिंग करणे म्‍हणजे अल्पकालीन चढ-उतारांवर प्रतिक्रिया देणे नव्हे, तर गुंतवणूक नवीन संधी आणि दीर्घकालीन आर्थिक कल यांच्याशी सुसंगत राहील याची खात्री घेणे महत्त्वाचे आहे.

भारतात या रिबॅलन्सिंग प्रक्रियेदरम्यान स्मॉल कॅप विभागाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
स्मॉल कॅप कंपन्या अनेकदा प्रत्‍यक्ष आर्थिक विस्‍ताराशी संबंध असलेल्‍या क्षेत्रांमध्ये कार्यरत असतात. भारत आपला उत्पादन पाया प्रबळ करत आहे, पायाभूत सुविधांचा विस्तार करत आहे आणि देशांतर्गत उपभोग वाढत आहे, तसतसे अनेक लहान कंपन्या या विकासाचा फायदा घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. काळासह, या व्यवसायांमध्ये लक्षणीय वाढ करण्‍याची आणि बाजारपेठ भांडवलामध्‍ये वाढ करण्‍याची क्षमता आहे. याच कारणामुळे बाजारपेठेतील विविध चक्रांदरम्यान संयम राखलेल्‍या गुंतवणूकदारांसाठी स्मॉल कॅप फंडांनी ऐतिहासिकदृष्ट्या दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अर्थात, हा प्रवास नेहमी सोपा नसतो. मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत स्मॉल-कॅप कंपन्यांच्या किमतींमध्ये अधिक तीव्र चढ-उतार पाहायला मिळू शकतात. पण, या अस्थिरतेमुळे दीर्घकालीन वाढीची संधी देखील निर्माण होते. विविध क्षेत्रांत गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड धोरणाद्वारे गुंतवणूक केली जाते, तेव्हा गुंतवणूकदारांना अनेक कंपन्या आणि क्षेत्रांचा लाभ मिळतो, ज्यामुळे एखाद्या विशिष्ट कंपनीशी संबंधित जोखीम कमी होण्यास मदत होते.

या क्षेत्रात वाढता फोकस बाजारपेठेत सुरू करण्यात येत असलेल्या नवीन गुंतवणूक धोरणांवरून दिसून येतो. आधुनिक युगातील मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या भावी उदयोन्मुख प्रमुख ओळखण्यासाठी स्मॉल-कॅप क्षेत्राकडे अधिक बारकाईने पाहत आहेत. उदाहरणार्थ, द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडने नुकतेच द वेल्थ कंपनी स्मॉल कॅप फंड सुरू केला आहे, ज्‍यामधून या व्‍यापक उद्योगाचा विश्वास दिसून येतो की, पुढील पिढीतील उच्‍च-विकास साध्य करणाऱ्या कंपन्या या क्षेत्रातून येऊ शकतात.

आजच्या अनिश्चित विश्वामध्‍ये वाटचाल करणाऱ्या गुंतवणूकदारांचे अस्थिरता टाळण्‍यासोबत स्थिरता आणि वाढीची क्षमता यांचे संयोजन असलेला पोर्टफोलिओ तयार करण्‍याचे उद्दिष्ट असले पाहिजे. पोर्टफोलिओमध्ये स्मॉल-कॅप्सचा मोजका वाटा समाविष्ट करून त्याचे रिबॅलन्सिंग करणे, हे संतुलन गाठण्‍यासाठी मार्ग असू शकतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
30.1 ° C
30.1 °
30.1 °
35 %
2.1kmh
40 %
Wed
34 °
Thu
32 °
Fri
21 °
Sat
30 °
Sun
32 °

Most Popular

Recent Comments