19.1 C
New Delhi
Monday, October 27, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानसिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे – दुसऱ्या वर्षीही एनआयआरएफ NIRF रँकिंग...

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे – दुसऱ्या वर्षीही एनआयआरएफ NIRF रँकिंग २०२५ मध्ये प्रथम

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे हे एनआयआरएफ NIRF रँकिंग २०२५ – स्किल विद्यापीठांमध्ये प्रथम

सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस, इंदौरने देखील दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले

पुणे-: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) २०२५ मध्ये पुन्हा एकदा सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU), पुणेने पहिले स्थान तर सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस, इंदौरने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. सलग दुसऱ्या वर्षी ‘स्किल युनिव्हर्सिटी’ या श्रेणीत पहिल्या क्रमांकावर राहून सिंबायोसिसने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

आज भारताचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते डॉ. स्वाती मुजुमदार, प्र- कुलगुरू, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे घेण्यात आला. दहाव्या आवृत्तीचे एनआयआरएफ (NIRF) रँकिंग या वेळी जाहीर करण्यात आले. या यादीत देशभरातील नामांकित विद्यापीठे, महाविद्यालये आणि संस्थांचा समावेश होता.

या वेळी प्रो. टी. जी. सीताराम अध्यक्ष, एआयसीटीई; डॉ. अनिल कुमार नास्सा सदस्य सचिव, एनबीए; धर्मेंद्र प्रधान, भारताचे शिक्षण मंत्री; सुकांता मजुमदार, शिक्षण राज्यमंत्री, हे उपस्थित होते.

स्किल युनिव्हर्सिटी श्रेणीतील टॉप रँकिंग (२०२५):

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे – प्रथम

सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस, इंदौर- द्वितीय

एनआयआरएफ (NIRF) रँकिंग ही वार्षिक राष्ट्रीय दर्जाची स्पर्धा असून अध्यापनाची गुणवत्ता, संशोधन, नवनिर्मिती, विद्यार्थी समाधान, नोकरी व करिअर संधी या विविध घटकांचा सखोल अभ्यास करून ही यादी जाहीर केली जाते.
या यशा बद्दल बोलताना, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र- कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, “विद्यार्थ्यांच्या प्रगतीला केंद्रस्थानी ठेवून कौशल्य-आधारित शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे यश आहे. सलग दोन वर्षे देशात सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीसाठी प्रथम क्रमांक मिळवणे आमच्यासाठी खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस, इंदोर कॅम्पसने त्याच क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे याचा मला आनंद आहे. एनआयआरएफ रँकिंग मध्ये कौशल्य विद्यापीठ श्रेणी सुरु होऊन २ वर्ष झाली आणि सलग दुसऱ्याही वर्षी स्किल्स युनिव्हर्सिटी साठी प्रथम स्थान पटकवल्याचा आनंद होत आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
19.1 ° C
19.1 °
19.1 °
88 %
0kmh
100 %
Mon
32 °
Tue
30 °
Wed
32 °
Thu
30 °
Fri
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!