पुणे, – : स्पेसेस आणि रीगस यांच्यासमवेत विविध ब्रँड्ससह काम करण्यासाठी जगातील सर्वात मोठे व्यासपीठ असलेल्या इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रुपने (आयडब्ल्यूजी) आज पुण्यात गौरव आयकॉन टॉवर आणि ४५ बाणेर स्ट्रीट येथे दोन नवीन रीगस केंद्रे उघडण्याची घोषणा केली. त्यामुळे भारतातील आघाडीच्या व्यावसायिक ठिकाणांपैकी एक असलेल्या ठिकाणी तिची उपस्थिती आणखी मजबूत झाली आहे. जगात आणि भारतात अधिक फ्लेक्झिबल कामकाजाच्या मॉडेल्सकडे कल वाढत असताना ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आयडब्ल्यूजी स्वतःचे नेटवर्क वेगाने वाढवत आहे. ही नवीन केंद्रे आयडब्ल्यूजीच्या वेगाने वाढणाऱ्या भारतातील उपस्थितीला बळकटी देत असून त्यामुळे पुण्यातील व्यवसायांना प्रीमियम कार्यक्षेत्रे आणि जगभरातील ५,००० हून अधिक ठिकाणी त्वरित प्रवेश लाभत आहे.
इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रुपचे सीईओ आणि संस्थापक मार्क डिक्सन म्हणाले, “या नवीन उद्घाटनासह आम्ही भारतात एक मजबूत आणि अत्यंत आवश्यक पाऊल ठेवत आहोत. एक महत्त्वाचे व्यवसाय केंद्र म्हणून पुणे ही आमच्यासाठी एक प्रमुख बाजारपेठ आहे. गौरव आयकॉन टॉवर येथील आणि ४५ बाणेर स्ट्रीट ही दोन्ही ठिकाणे आमच्या विस्तार योजनांना चालना देण्यासाठी उत्तम आहेत. व्यवस्थापन करारांतर्गत रीगस ब्रँड विकसित करून त्यांच्या इमारतींमध्ये अत्याधुनिक कार्यक्षेत्रे जोडली जावीत, यासाठी गौरव आयकॉन इन्फ्राटेकचे संचालक श्री. गौरव वाघमारे आणि रायचंदानी कन्स्ट्रक्शन्सचे भागीदार श्री. करण रायचंदानी यांच्यासोबत भागीदारीत काम करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
आयडब्ल्यूजीचा रीगस ब्रँड हा आजच्या हायब्रिड वर्कफोर्सच्या विकसनशील गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेले व्यावसायिक आणि फ्लेक्झिबल वर्कस्पेस सोल्यूशन्स प्रदान करण्याशी समानार्थी बनला आहे. जागतिक उद्योगांपासून उदयोन्मुख स्टार्ट-अप्सपर्यंतच्या व्यवसायांना प्रेरणादायी कार्यालये, सहयोगी बैठक कक्ष आणि अखंड डिजिटल सेवांसह रीगस सक्षम बनवते.


