25.8 C
New Delhi
Thursday, July 31, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानलॉयड्स मेटल्स-येथील कामगार आहेत खरे कंपनीचे मालक - वेंकटेसन यांचे मत

लॉयड्स मेटल्स-येथील कामगार आहेत खरे कंपनीचे मालक – वेंकटेसन यांचे मत

पुणे : खाणकाम आणि उत्पादन क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी हा नेहमीच ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. ही कंपनी लोह खनिज उत्पादनापासून डीआरआय मॅन्युफॅक्चरींगच्या व्यवसायात आहे. लॉयड्स मेटल्स आपल्या कर्मचाऱ्यांना ‘सर्वात मोठी संपत्ती’ मानते, आणि त्यांच्या कामाला महत्त्व देते. कंपनी कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी विविध उपक्रम राबवते, ज्यामुळे एक सकारात्मक आणि उत्साही कामाचे वातावरण तयार होते अशी प्रतिक्रिया लॉयड्स मेटल्सचे ग्रुप सीएचआरओ वेंकटेसन आर म्हणाले.

आमचा असा विश्वास आहे की मालकी हक्क सामायिक केला पाहिजे, विशेषतः ज्यांनी आमच्या मुख्य उद्योगात वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम केले आहे. ते देखील आमच्या कंपनीचे मालकच आहेत असे मला वाटते अशी प्रतिक्रिया देखील सीएचआरओ वेंकटेसन आर यांनी व्यक्त केली.

एम्प्लॅायी स्टॉक ओनरशिप प्लॅन (इएसओपी) ही एक कर्मचाऱ्यांच्या लाभाकरिता असलेली योजना आहे जी कामगारांना स्टॉकच्या शेअर्सच्या रूपात कंपनीमध्ये मालकी स्वारस्य देते. आजपर्यंत, २७०० हून अधिक कर्मचाऱ्यांना इएसओपी योजनेचा फायदा झाला आहे. यामध्ये १७०० हून अधिक अधिकारीवर्ग तर १००० हून अधिक कामगारांचा समावेश आहे. इएसओपी फक्त ४ रुपये प्रति शेअर या किमतीत दिले जातात, त्यामुळे कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होतो. या योजनेच्या स्थापनेपासून, कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एकूण १.४३ कोटींहून अधिक शेअर्स दिले आहेत.

लॉयड्समधील कर्मचाऱ्यांना उत्तमोत्तम करिअर घडविण्याची संधी मिळते. येथील कर्मचाऱ्यांना व्यावहारिक कौशल्य, तांत्रिक प्रशिक्षण,नेतृत्व विकास आणि कार्यकारी प्रशिक्षणाचा लाभ घेता येतो. लॉयड्समधील कर्मचाऱ्यांना केवळ व्यवसायातच नव्हे तर वैयक्तिक पातळीवरही विकासाची संधी उपलब्ध करुन दिली जाते. स्थानिक नागरिकांना तसेच महिलावर्गाला या ठिकाणी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करुन देत एचइएमएम (हेवी अर्थ मूव्हिंग मशिनरी) चालविण्यासारख्या भूमिकांमध्ये महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला जात आहे.

हे प्रयत्न केवळ स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करत नाहीत तर बेरोजगारी असलेल्या प्रदेशांमध्ये नोकरीची संधी मिळविण्याचा स्वप्न पूर्ण करताय.जर तुम्हाला नोकरीपेक्षा मोठ्या गोष्टीचा भाग व्हायचे असेल,जर तुम्हाला खरा प्रभाव निर्माण करायचा असेल, मालकी हवी असेल आणि योग्य मूल्यांसह वाढीची मानसिकता असेल, तर लॉयड्स मेटल हे तुमच्यासाठी एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे, असेही वेंकटेसन यांनी स्पष्ट केले.

लॉयड्स मेटल केवळ सध्याच्या ऑपरेशनल गरजांसाठी त्यांचे कर्मचारी तयार करत नाही; ते भारतीय उत्पादन क्षेत्रात नेतृत्व करणारे अभियंते, तंत्रज्ञ आणि सक्षम अशा पुढच्या पिढीला तयार करतात. भारतीय खाणकाम आणि उत्पादनाचे भविष्य बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी, लॉयड्स मेटल्स नक्कीच खास ठरतेय. येणाऱ्या प्रत्येक नवीन वर्षात भारताची औद्योगिक स्थिती आणखी उंचावण्याचा प्रयत्न यामाध्यमातून केला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
25.8 ° C
25.8 °
25.8 °
87 %
1.9kmh
100 %
Thu
31 °
Fri
33 °
Sat
35 °
Sun
33 °
Mon
31 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!