एकूण गुंतवणूक आता रु. ५५४ कोटी (६७ मिलियन अमेरिकन डॉलर्स), त्यामुळे प्रगत ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारताचे स्थान मजबूत होणार, रोजगार निर्मितीला चालना मिळणार आणि भारत सरकारच्या “मेक इन इंडिया, फॉर द वर्ल्ड” या दृष्टिकोनाला बळकटी मिळणार
सीईओ ख्रिश्चन सोबोट्का यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या विस्तारामुळे क्षमतेमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ होणार, त्यामुळे २०२७ पर्यंत दरवर्षी ४ मिलियन कार ऑडिओ घटक, १.४ मिलियन इन्फोटेनमेंट युनिट्स आणि ०.८ मिलियन टेलिमॅटिक्स युनिट्सचे उत्पादन शक्य होणार
पुणे, भारत – २७ ऑक्टोबर २०२५ : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आणि कनेक्टेड ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानातील जागतिक आघाडीची कंपनी असलेल्या ‘ हार्मन’ ने आज पुण्यातील चाकण येथे आपल्या ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सुविधेचा विस्तार करण्यासाठी रु. ३४५ कोटी (४२ मिलियन अमेरिकन डॉलर्स) नवीन गुंतवणुकीची घोषणा केली.
तात्काळ विस्तारासाठी रु. ४५ कोटी (५.५ मिलियन अमेरिकन डॉलर्स) आणि पुढील तीन वर्षांत प्रगत टेलिमॅटिक्स आणि पुढील पिढीतील ऑटोमोटिव्ह कनेक्टिव्हिटी कार्यक्रमांना पाठिंबा देण्यासाठी अतिरिक्त रु. ३०० कोटी (३६.५ मिलियन अमेरिकन डॉलर्स) यांचा या गुंतवणुकीत समावेश आहे. या नवीन कटिबद्धतेसह २०१४ मध्ये स्थापनेपासून पुण्यातील प्लांटमध्ये ‘हार्मन’ची एकत्रित गुंतवणूक आता ५५४ कोटी रुपयांवर (६७ मिलियन अमेरिकन डॉलर्स) पोहोचली आहे. या विस्तारामुळे २०२७ पर्यंत पुण्यात ३०० नवीन नोकऱ्या निर्माण होतील.
प्रमुख मुद्दे
- पुण्यातील ऑटोमोटिव्ह उत्पादन प्रकल्पाच्या विस्तारासाठी ३४५ कोटी रुपयांची (४२ मिलियन अमेरिकन डॉलर्स) नवीन गुंतवणूक.
- उत्पादन क्षमता ५०% ने वाढणार.
- विस्ताराचा भाग म्हणून ३०० नवीन नोकऱ्या निर्माण होतील.
- पुढील पिढीतील टेलिमॅटिक्स कंट्रोल ‘हार्मन’ रेडी कनेक्टचे उत्पादन भारतात होणार.
- २०३० पर्यंत १००% हरित ऊर्जा संक्रमणासह, हरित उत्पादनावर लक्ष केंद्रित.
या विस्तारामुळे भारत सरकारच्या “मेक इन इंडिया, फॉर द वर्ल्ड” या दृष्टिकोनाला बळकटी मिळत आहे. कनेक्टेड आणि शाश्वत मोबिलिटी उत्पादनांच्या प्रगत ऑटोमोटिव्ह उत्पादनासाठी एक प्रमुख जागतिक केंद्र म्हणून भारताला स्थान मिळणार आहे.
‘हार्मन’ चे सीईओ आणि ऑटोमोटिव्ह विभागाचे अध्यक्ष ख्रिश्चन सोबोट्का म्हणाले, “ही गुंतवणूक भारताप्रति असलेल्या आमच्या कटिबद्धतेचा स्पष्ट संकेत आहे. पुण्यामध्ये केवळ क्षमता वाढत नाही तर ते कनेक्टेड कारचे भविष्य घडत आहे. फाईव्ह जी टेलिमॅटिक्सपासून ते शाश्वत उत्पादनापर्यंत भारताच्या प्रतिभा आणि नाविन्यपूर्णतेच्या सामर्थ्यामुळे तो ‘हार्मन’च्या जागतिक ऑटोमोटिव्ह वाढीचा केंद्रबिंदू बनला आहे.”
‘ हार्मन’चा पुण्यातील कारखाना कॉकपिट्स, टेलिमॅटिक्स युनिट्स आणि कार ऑडिओ सिस्टीमसह कनेक्टेड कार तंत्रज्ञानासाठी जागतिक उत्पादन केंद्र म्हणून काम करत आहे. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, महिंद्रा आणि महिंद्रा यांसारख्या सर्व भारतीय मूळ उपकरण उत्पादकांना (ओईएम) तसेच युरोप आणि उत्तर अमेरिकेतील निर्यातदार ग्राहकांना तो सेवा पुरवितो.
या नवीन विस्तारामुळे ७१,५०५ चौरस फूट बिल्ट-अप क्षेत्रफळ वाढणार आहे, यामध्ये ४५,००० चौरस फूट उत्पादन शॉप फ्लोअरचा समावेश असेल. यामुळे चार नवीन एसएमटी लाईन्ससह ५०% ने क्षमता वाढणार असून मॉड्यूल उत्पादन आणि स्पीकर उत्पादन यांसारख्या नवीन क्षमता वाढणार आहेत. हा प्लांट आता २०२७ पर्यंत ४ मिलियन कार ऑडिओ घटक, १.४ मिलियन इन्फोटेनमेंट युनिट्स आणि ०.८ मिलियन टेलिमॅटिक्स कंट्रोल युनिट्सचे (टीसीयू) वार्षिक उत्पादन करण्यासाठी सज्ज आहे.
नव्या उत्पादन श्रेणींमध्ये टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकीसाठी टीसीयूसारख्या (टी सी यू ) फाईव्ह जी आणि फोर जी टेलिमॅटिक्स उत्पादनांचा समावेश असेल. तसेच ‘हार्मन’ रेडी कनेक्ट या सॅमसंगसह सह-विकसित पूर्व-विकसित, स्थानिक पातळीवर उत्पादित ऑल-इन-वन टेलिमॅटिक्स कंट्रोल युनिटचा समावेश असेल.
‘हार्मन’ रेडी कनेक्टमध्ये ओटीए (ओव्हर-द-एअर) अपडेट्स, बिल्ट-इन सायबर सुरक्षा, डायग्नोस्टिक्स आणि क्लाउड इंटिग्रेशन आहे. तसेच वाढीव सुरक्षिततेसाठी ते टाइम, कॉन्टेक्चुअल वि २एन (व्हेइकल-टू-नेटवर्क) अलर्ट देण्यासाठी ‘हार्मन’ रेडी अवेअरसोबत इंटिग्रेट केले आहे.
या उत्पादनाची निश्चिती, विकास आणि प्रमाणीकरणात ‘हार्मन’ च्या भारतातील टीमने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आशिया आणि उत्तर अमेरिकेतील आघाडीच्या ओईएमनी आधीच याचा अंगीकार केला असून ‘हरमन’ रेडी कनेक्ट हे कंपनीच्या “ग्राहक अनुभव. ऑटोमोटिव्ह ग्रेड” याच्याशी कटिबद्धतेचे उदाहरण आहे. ग्राहक-अनुकूल वाटणारे परंतु सर्वात कठोर ऑटोमोटिव्ह मानके पूर्ण करणारे इन-व्हेइकल इंटेलिजन्स ते प्रदान करते.
पुण्यात आता फाईव्ह जी रेडी कनेक्ट उत्पादन सुरू झाल्यामुळे, ‘हार्मन’ ऑटोमोटिव्ह विश्वासार्हतेसह ग्राहक-दर्जाचे, कनेक्टेड इन-कार अनुभव देण्याची क्षमता मजबूत करत आहे. स्थानिक उत्पादनाच्या या पावलामुळे ओईएम भागीदारांना पुढील पिढीतील कनेक्टिव्हिटी, सुरक्षितता आणि मनोरंजन अनुभव ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.
जागतिक ऑटोमोटिव्ह संशोधन आणि विकास केंद्र म्हणून ‘हार्मन’ इंडियाची भूमिका
भारत हा ‘हार्मन’च्या जागतिक ऑटोमोटिव्ह व्यवसायामध्ये नावीन्यपूर्णतेचा मुख्य आधार म्हणून उदयास आला आहे. ‘हरमन’ ऑटोमोटिव्ह इंडियाच्या ५००० सदस्यांच्या टीमकडे उत्पादन व्यवस्थापन, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अभियांत्रिकी, उत्पादन आणि गुणवत्ता या क्षेत्रात एंड-टू-एंड क्षमता आहेत.
‘हार्मन’ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि ऑटोमोटिव्ह प्रमुख कृष्णा कुमार म्हणाले, “भारत हा असा देश आहे जिथे ‘हार्मन’ पुढील पिढीतील इन-कार अनुभवांची रचना, बांधणी आणि निर्यात करते. कनेक्टेड इन्फोटेन्मेंटपासून ते इमर्सिव्ह ऑडिओ ते टेलीमॅटिक्स आणि कनेक्टेड सेफ्टी सोल्यूशन्सपर्यंत, आमचे येथील अभियंते केवळ भारताची सेवा करत नाहीत – ते जगाची सेवा करतात. म्हणूनच भारत ‘हार्मन’च्या जागतिक ऑटोमोटिव्ह धोरणाच्या केंद्रस्थानी आहे.”
पुण्यातील ही सुविधा कंपनीच्या शाश्वततेच्या प्रवासाचेसुद्धा नेतृत्व करत आहे. तिच्या ऑन-साईट सौर प्रतिष्ठापनांमध्ये दरवर्षी ३१७,००० किलोवॅट-अवरपेक्षा जास्त वीजनिर्मिती होते. त्यामुळे जवळजवळ २०० मेट्रिक टन सीओ २ उत्सर्जन कमी होते. जागतिक दर्जाच्या कामगिरीविषयी पुणे टीमच्या कटिबद्धतेला उद्योगाकडून सन्मानाची दाद मिळाली आहे. यामध्ये ऊर्जा कार्यक्षम युनिटसाठी सीआयआय पुरस्काराचा समावेश आहे.
‘हार्मन’च्या जागतिक साउंड पर्पज इएसजी फ्रेमवर्क, रणनीती आणि कटिबद्धतेशी सुसंगत असलेली ही सुविधा २०३० पर्यंत १००% अक्षय वीज वापराकडे वाटचाल करत आहे. तिथे डिझेल जनरेटर काढून टाकण्यात आले आहेत, ऊर्जा कार्यक्षमतेसाठी प्रॉडक्शन लाईन ऑप्टिमाइझ करण्यात आल्या आहेत आणि कच्च्या मालाची नासाडी व जीवनचक्र प्रभाव कमी करण्यासाठी पर्यावरण-जागरूक डिझाइन तत्त्वे समाविष्ट करण्यात आली आहेत.
पुण्यातील सुविधेच्या स्थापनेपासून तिथे शून्य ओएसएचए-रेकॉर्डेबल दुखापती दर राखण्यात आला आहे. यातून सुरक्षा आणि कामकाजातील उत्कृष्टतेच्या सर्वोच्च मानकांप्रती ‘हार्मन’ची कटिबद्धता अधोरेखित होते.
पुण्यातील ही विस्तारित सुविधा चीन, हंगेरी, मेक्सिको, ब्राझील आणि जर्मनीमधील ‘हार्मन’च्या जागतिक उत्पादन नेटवर्कला पूरक ठरणार आहे. त्यामुळे कनेक्टेड, इंटेलिजेंट आणि शाश्वत ऑटोमोटिव्ह उत्पादनांना चालना देण्यामध्ये भारताची महत्त्वाची भूमिका अधोरेखित होते.
स्थानिक नवोपक्रम, स्वच्छ ऊर्जेचा अवलंब आणि प्रगत टेलिमॅटिक्स उत्पादनाद्वारे, ‘हार्मन’ हे दाखवून देते की शाश्वतता आणि तंत्रज्ञानातील अग्रेसरत्व हातात हात घालून चालते. स्मार्ट मोबिलिटीदेखील अधिक शाश्वत असू शकते या कंपनीच्या विश्वासाला त्यातून पुष्टी मिळते.


