31.4 C
New Delhi
Friday, July 11, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानइन्फोसिस फाऊंडेशनकडून आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्ड्सच्या चौथ्या आवृत्तीची केली घोषणा

इन्फोसिस फाऊंडेशनकडून आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्ड्सच्या चौथ्या आवृत्तीची केली घोषणा

भारतातील सामाजिक बदलांच्या प्रवर्तकांच्या मदत व सक्षमीकरणासाठी २ कोटी रूपयांची वचनबद्धता

पुणे , : इन्फोसिस फाऊंडेशन या इन्फोसिसच्या परोपकार आणि सीएसआर विभागाने आपल्या आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्ड्सच्या चौथ्या आवृत्तीची घोषणा केली आहे. भारतात सामाजिक नवचैतन्याला चालना देण्याप्रति आपली वचनबद्धता स्पष्ट करताना इन्फोसिस फाऊंडेशन या पुरस्कारांत सहभागी होण्यासाठी देशभरातील नवप्रवर्तक आणि सामाजिक उद्योजकांना आमंत्रित करत आहे.

आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्ड्स २०२५ चे उद्दिष्ट भारतातील वंचित समुदायांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडण्याची क्षमता असलेल्या अद्वितीय तंत्रज्ञान-आधारित उपायांचा विकास करणाऱ्या व्यक्ती, संघटना, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक उपक्रमांचा गौरव करून पारितोषिक देण्याचा आहे. इन्फोसिस फाउंडेशन प्रत्येक विजेत्याला ५० लाख रुपयांपर्यंत बक्षीस देण्याचे वचन देते. त्याची एकूण बक्षीस रक्कम २ कोटी रुपयांची आहे.

आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्ड्स २०२५ मध्ये शिक्षण, आरोग्यसेवा ,पर्यावरणीय शाश्वतता या तीन श्रेणींमध्ये अर्ज १५ जून पर्यंत स्वीकारले जातील. १८ वर्षे वयावरील भारतात राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेशिका खुल्या आहेत. सहभागी व्हिडिओजच्या स्वरूपात आपल्या कामाचे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या प्रवेशिका दाखल करू शकतात. ते आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्ड्सच्या वेबसाइटवर अपलोड केले जातील. आणि प्रवेशिका पूर्णपणे कार्यरत प्रोटोटाइप किंवा पूर्ण झालेला प्रकल्प असावा. ती फक्त एक संकल्पना, कल्पना किंवा माहिती नसावी.

“इन्फोसिस फाउंडेशनमध्ये आम्ही जगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समुदायांच्या प्रगतीसाठी नावीन्यपूर्णतेच्या शक्तीवर विश्वास ठेवतो. आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्ड्सच्या माध्यमातून आम्ही शिक्षण, आरोग्यसेवा आणि पर्यावरणीय शाश्वततेमध्ये प्रभावी उपाययोजना देणाऱ्या व्यक्तींची ओळख समाजाला करून देण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. भारतातील सामाजिक नवसंशोधकांना पुढे येण्यास त्यांचे विचार व्यक्त करण्यास आणि एक खरा बदल घडवून आणण्यास प्रोत्साहित करतो. या चौथ्या आवृत्तीसह आम्ही प्रत्येकासाठी पुढील संधी निर्माण करण्यासाठी मानवी क्षमता वाढविण्याच्या आमच्या उद्देशाला पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवतो,” असे इन्फोसिस फाउंडेशनचे विश्वस्त सुमित विरमणी म्हणाले.

अंतिम विजेते निश्चित करण्यासाठी प्रतिष्ठित परीक्षकांचे एक पॅनेल निवडलेल्या सहभागींचे मूल्यांकन करेल. अंतिम विजेत्यांचे मूल्यांकन खालील निकषांवर केले जाईल:

खऱ्या समस्या: खऱ्या सामाजिक आव्हानांवर प्रत्यक्ष उपाययोजनांद्वारे उपाय काढणे.
प्रभावी उपाययोजना: प्रभावी, मूल्यमापनयोग्य आणि शाश्वत उपाययोजना.
वचनबद्ध संस्थापक: एक अर्थपूर्ण बदल घडवण्यासाठी वचनबद्ध असलेले विचारी नवप्रवर्तक.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
31.4 ° C
31.4 °
31.4 °
50 %
3.1kmh
61 %
Fri
31 °
Sat
39 °
Sun
38 °
Mon
38 °
Tue
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!