31.2 C
New Delhi
Wednesday, September 10, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानकोटक लाईफ तर्फे कोटक सिग्नेचर टर्म प्लॅनचा शुभारंभ

कोटक लाईफ तर्फे कोटक सिग्नेचर टर्म प्लॅनचा शुभारंभ

पुणे, : कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (“कोटक लाईफ”) ने कोटक सिग्नेचर टर्म प्लॅन या नवीन विमा योजनेचा शुभारंभ करत असल्याची घोषणा केली आहे. सध्या उदयास येत असलेले श्रीमंत पगारदार व्यावसायिक आणि उद्योजक यांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेली ही एक शुद्ध संरक्षण टर्म विमा योजना आहे. ही योजना ग्राहकांना अतिशय योग्य प्रीमियम दरात भरभक्कम आर्थिक संरक्षण प्रदान करते. त्यामुळे कुटुंबांना त्यांची जीवनशैली टिकवून ठेवता येते, त्याचबरोबर आपला कौटुंबिक वारसा आणि पंरपरा जपण्यासही त्यांना मदत होते.

ठळक वैशिष्ट्ये :
•परवडणाऱ्या प्रिमीयममध्ये उच्च लाईफ कव्हर
•पगारदार व्यावसायिक, महिला, ऑनलाइन खरेदीदार आणि इतरांसाठी सवलती
•स्पेशल एक्झिट पर्याय – तुमचे सर्व प्रीमियम परत मिळवा*
•वाढीव विमा संरक्षणासाठी अतिरिक्त रायडर्स: कोटक ऍक्सीडेंटल डेथ बेनिफिट, कोटक परमनंट डिसॅबिलिटी बेनिफिट आणि कोटक क्रिटिकल इलनेस प्लस बेनिफिट

भारतात महत्त्वाकांक्षी आणि स्वयंप्रेरित व्यक्तींची नवीन पिढी उदयास आलेली आहे. ही पिढी केवळ उत्पन्नच कमवत नाही तर सक्रियपणे गुंतवणूक, बचत आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक वारसा (विरासत) तयार करत आहे. या पिढीतील व्यक्ती विविध पर्यांयाव्दारे त्यांचे आर्थिक भविष्य घडवत आहेत. तथापि, आर्थिक प्रगतीला बहुतांशवेळा संरक्षण नियोजनाचे पुरेसे पाठबळ लाभलेले दिसत नाही.

नवीन योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना कोटक लाईफचे एमडी आणि सीईओ महेश बालसुब्रमण्यम म्हणाले, “कोटक लाईफचे लक्ष नेहमी काळाशी अनुरूप आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या विमा योजना सादर करण्यावर केंद्रीत राहिलेले आहे. कोटक सिग्नेचर टर्म प्लॅन भारतातील श्रीमंत व्यावसायिक आणि उद्योजकांच्या वाढत्या संख्येला विचारात घेऊन अतिशय काळजीपुर्वक तयार करण्यात आलेली खास योजना आहे. ही योजना त्यांच्या आकांक्षांशी जुळणारे फायदे प्रदान करते. तसेच ग्राहकांच्या बदलत्या गरजा समजून घेणे, नवोपक्रमाला चालना देणे आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचे भविष्य आत्मविश्वासाने सुरक्षित करण्यासाठी सक्षम करण्याच्या बाबतीत असलेले आमचे समर्पण प्रतिबिंबित करते.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
31.2 ° C
31.2 °
31.2 °
67 %
4.5kmh
7 %
Wed
36 °
Thu
36 °
Fri
37 °
Sat
37 °
Sun
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!