14.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानओमॅक्सकडून हरमनप्रीत कौरची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती

ओमॅक्सकडून हरमनप्रीत कौरची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती

क्रीडा आणि खेळाडूंप्रती कंपनीची कटिबद्धता केली आणखी दृढ

पुणे, : ओमॅक्स लिमिटेडने भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. क्रीडा आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा सामुदायिक विकास, आर्थिक संधी आणि राष्ट्र उभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, यावर असलेल्या ओमॅक्सच्या विश्वासाचे प्रतिबिंब या धोरणात्मक सहकार्यातून पडले आहे.

ही भागीदारी सेलिब्रिटींशी पारंपारिक कराराच्या पलीकडे जात नेतृत्व, लवचिकता आणि योग्य व्यासपीठ लाभल्यास प्रतिभांचे करिअरमध्ये रूपांतर कसे होऊ शकते, या विश्वासाच्या सामायिक मूल्यांवर आधारित आहे.

क्रीडा उत्कृष्टतेला पाठिंबा देण्याच्या आणि खेळाडूंनी प्रगती करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या ओमॅक्सच्या दृष्टिकोनाला हरमनप्रीतसोबतच्या भागीदारीमुळे बळ मिळत आहे. खेळ, विश्रांती आणि संस्कृतीसाठी एकात्मिक स्थान म्हणून गेल्या वर्षी द ओमॅक्स स्टेट लाँच करण्यात आले होते. त्याचाच आधार घेत केलेल्या या सहकार्यातून महत्त्वाकांक्षेचे रूपांतर प्रतिभेचे पोषण करणाऱ्या आणि उपजीविका निर्माण करणाऱ्या मूर्त सुविधा आणि कार्यक्रमांमध्ये करण्याच्या ओमॅक्सच्या हेतूचे प्रतिबिंब पडले आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाने विश्वचषकामध्ये एक प्रेरणादायी अध्याय लिहिला असताना या घडामोडीचा आनंद साजरा करण्यात आणि त्यांना पाठिंबा देण्यात ओमॅक्स देशासोबत उभा आहे.

या सहकार्याविषयी बोलताना हरमनप्रीत कौर म्हणाल्या, ओमॅक्सची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून सहभागी झाल्याचा आणि तरुणांना सक्षम बनविण्यावर, समुदायांना बळकट करण्यावर आणि स्वप्नांना प्रेरणा देणाऱ्या आणि त्यांना यशात रूपांतरित करणाऱ्या सुविधा निर्माण करण्यावर विश्वास ठेवणाऱ्या कंपनीसोबत उभे राहण्याचा मला अभिमान आहे.”

ओमॅक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मोहित गोयल म्हणाले, “आम्ही हरमनप्रीतचे ओमॅक्स परिवारात मोठ्या अभिमानाने स्वागत करतो. तिच्या नेतृत्व, समर्पण आणि प्रेरणा देण्याच्या क्षमतेतून ओमॅक्सच्या उद्देशपूर्ण विकासासाठीच्या कटिबद्धतेचे प्रतिबिंब पडते. खेळांची सुलभता वाढविणारे, अॅथलेटिक्समध्ये महिलांच्या अधिक सहभागाला प्रोत्साहन देणारे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकट करणारे व्यासपीठ तयार करण्यासाठी ही भागीदारी आहे. राष्ट्रीय राजधानीत १४० वर्षांपेक्षा अधिक काळानंतर एका नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमची निर्मिती हा या दृष्टिकोनाचा एक महत्त्वाचा परिणाम असेल – या शहरासाठी आणि भारतीय खेळासाठी हा एक मैलाचा दगड असेल.”

या सहकार्याअंतर्गत, ओमॅक्स आणि हरमनप्रीत कौर अॅथलेट्स विकास कार्यक्रम, तळागाळातील संपर्क, सामुदायिक कार्यक्रम आणि क्रीडा क्षेत्राला व्यवहार्य करिअर आणि सक्षमीकरणाचा स्रोत म्हणून जागरूकतेसाठी मोहिमा यांसारख्या उपक्रमांमध्ये सहयोग करतील. महिला सक्षमीकरण आणि क्रीडा क्षेत्रात महिलांच्या अधिक सहभागाला प्रोत्साहन देणे, तरुण मुलींना आत्मविश्वासाने त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास प्रेरित करणे यावर मुख्य भर देण्यात येईल. मिश्र-वापर विकासांमध्ये क्रीडा, विरंगुळा आणि उपजीविकेच्या संधी यांचा मिलाफ करण्याच्या ओमॅक्सच्या प्रयत्नांनाही ही भागीदारी बळकटी देईल. त्यामुळे क्रीडा पायाभूत सुविधांचा लाभ उच्चभ्रू खेळाडूंनाच नव्हे तर संपूर्ण समुदायांना होईल, याची सुनिश्चिती होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
14.1 ° C
14.1 °
14.1 °
72 %
0kmh
0 %
Wed
20 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!