30.9 C
New Delhi
Tuesday, July 1, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानएबीईएकडून राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त 'पीजीडीजीई' कार्यक्रम सुरू

एबीईएकडून राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त ‘पीजीडीजीई’ कार्यक्रम सुरू

'एनईपी'नुसार शिक्षकांना अद्ययावत करण्यासाठी होणार मदत

पुणे,-: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (एनईपी) ची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात महत्त्वाच्या टप्प्यात दाखल होत असतानाच एक नवीन शिक्षक प्रशिक्षण उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आदित्य बिर्ला एज्युकेशन अॅकॅडमीतर्फे (एबीईए) चालविण्यात येणारा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ग्लोबल एज्युकेशन (‘पीजीडीजीई’) आता जुलै २०२५ मध्ये प्रवेशासाठी खुला झाला आहे. यातून पुण्यातील शिक्षकांना बदलत्या शैक्षणिक परिस्थितीनुसार वर्गात शिकविण्याची त्यांची कौशल्ये अद्ययावत करण्यासाठी सुव्यवस्थित व पूर्णपणे ऑनलाईन मार्ग उपलब्ध झाला आहे.

“आधारशिला” हा पायाभूत अभ्यासक्रम, त्रिभाषिक शिक्षण आणि प्रकल्प-आधारित मूल्यांकनासह एनईपीच्या समावेशनावर महाराष्ट्राने जोर दिला आहे. त्यामुळे आपले शिक्षक हे राष्ट्रीय शिक्षण धोरणासाठी तयार असल्याची सुनिश्चिती करण्यासाठी शाळांवर प्रचंड दबाव आला आहे. मात्र, सध्या सेवारत असलेल्या बहुतांश शिक्षकांना या धोरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या डिजिटल, सर्वसमावेशक आणि अनुभवात्मक शिक्षणपद्धतींची मर्यादित माहिती आहे. सरकारच्या २०२३ मधील पाहणीनुसार, भारतातील ९७ लाख शिक्षकांपैकी केवळ ३०% शिक्षकांना या क्षेत्रांमध्ये औपचारिक प्रशिक्षण मिळाले आहे.

कौशल्याची ही वाढती तफावत ओळखून, एबीईएचा ‘पीजीडीजीई’ अभ्यासक्रम राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त, एनईपीशी अनुकूल असा अभ्यासक्रम उपलब्ध करून देतो. तो जागतिक मानकांची पूर्तता करतो आणि होतकरू व अनुभवी अशा इच्छुक आणि शिक्षकांसाठी तयार केलेला आहे. वर्षभर चालणाऱ्या या ऑनलाईन कार्यक्रमात प्रत्यक्ष सत्रे, असिंक्रोनस मॉड्यूल आणि मेंटरशिप यांचा मिलाफ घडला आहे. तो विद्यार्थीकेंद्रित सूचना, डिजिटल प्रवाह, बहुभाषिक रणनीती आणि वास्तविक जगातील वर्गातील नाविन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

एबीईएचे कार्यक्रम संचालक प्रदीप्त होरे म्हणाले, “पुणे हे नेहमीच शिक्षण क्षेत्रातील अग्रणी राहिलेले आहे, आपल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कसे गुंतवून ठेवले पाहिजे यात एनईपीमुळे बदल होण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘पीजीडीजीई’ शिक्षकांना आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक प्रासंगिकतेसह या परिवर्तनाचे नेतृत्व करण्याची साधने पुरवते.”

‘पीजीडीजीई’च्या स्थापनेपासूनच मुंबई, औरंगाबाद, हैदराबाद आणि शारजाह, कतार आणि बांगलादेश यांसह अनेक आंतरराष्ट्रीय शहरांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाच्या २०२३-२४ च्या गटातील, ८८% सहभागींनी जागतिक आणि एनईपी आराखड्याशी सुंसगत असल्याचे मत व्यक्त केले, तर यामुळे आपल्या वर्गातील व्यवहारावर थेट सुधारणा झाल्याचे ६८% नी सांगितले. एकविसाव्या शतकातील कौशल्ये, प्रकल्प-आधारित शिक्षण आणि शिक्षक नेतृत्व यावरील मॉड्यूल्स सर्वात प्रभावी असल्याचे शिक्षकांनी नमूद केले. महत्त्वाचे म्हणजे, सहभागींपैकी ७२% सहभागी हे ४० वर्षांखालील होते. भारतातील पुढच्या पिढीतील शिक्षकांकडून जोरदार मागणीचे प्रतिबिंब त्यातून पडले आहे.

‘पीजीडीजीई’चे हे मॉडेल एससीईआरटी आणि ‘दीक्षा’ उपक्रमांद्वारे पाठबळ दिलेल्या शिक्षक प्रशिक्षणावर महाराष्ट्राच्या आग्रहाशी सुसंगत आहे. जिथे सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही संस्था वेगाने बदलत आहेत अशा पुण्यासारख्या शहरांसाठी हा मोठ्या प्रमाणात राबविण्यासारखा पर्याय बनला आहे.

पुण्यातील विशेषत: सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य शिक्षण मंडळाशी (एसएससी) संलग्न शाळांमधील शिक्षकांना ‘पीजीडीजीई’मुळे येणारी लवचिकता आणि खोलीचा लाभ होणार आहे. उदयोन्मुख अशा शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानक (नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स – एनपीएसटी) अंतर्गत सतत व्यावसायिक विकासाची (सीपीडी) अपेक्षा पूर्ण करण्यास शिक्षकांना या अभ्यासक्रमामुळे मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
30.9 ° C
30.9 °
30.9 °
51 %
3.6kmh
76 %
Tue
36 °
Wed
38 °
Thu
38 °
Fri
32 °
Sat
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!