पुणे :पुणे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे सुरू असलेल्या ओरिएंटेशन वीक 2025–27 च्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेचा प्रेरणादायी अनुभव लाभला.

या प्रसंगी DTM श्रीमती मुक्ता नाडकर्णी, DTM डॉ. कमलजीत कौर, DTM श्री. बिमन गांधी आणि DTM श्री. पृथिराज स्वैन आदी मान्यवरांचे स्वागत व सत्कार संस्थेच्या संचालिका डॉ. पोरीनीता बनर्जी यांनी केला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले डेमो मिटिंग विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरले. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वृद्धी यांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवलं.
विद्यार्थ्यांना दिलेल्या मौल्यवान मार्गदर्शन आणि प्रेरणेबद्दल टोस्टमास्टर्स इंटरनॅशनलचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.