पुणे,- : पुणे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) तर्फे मॅंचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी, यू.के. येथील एमबीए डायरेक्टर व रीडर (एसोसिएट प्रोफेसर) – HRM, डॉ. अॅनास्टेसिया किनिगू यांचे “Preparing MBAs for Success” या विषयावर ऑनलाईन सत्र आयोजित करण्यात आले.
या सत्रात विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी महत्त्वपूर्ण बाबी समजल्या. QS World Future Skills Index नुसार ग्रीन, एआय व डिजिटल कौशल्यांची वाढती मागणी त्यांनी अधोरेखित केली. World Economic Forum – Core Skills 2030 मधील अनुकूलता, सर्जनशीलता व समस्यासोडवणूक या कौशल्यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. GLOBE Project च्या आधारे संस्कृतीचा नेतृत्व कार्यक्षमतेवर होणारा प्रभावही त्यांनी उलगडून दाखवला.
त्यांनी सहानुभूती, लवचिकता व आंतरसंस्कृती कौशल्य ही भविष्यातील नेत्यांसाठी आवश्यक मूल्ये असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. स्वतःचा व्यावसायिक प्रवास सांगताना त्यांनी जागतिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या उपयुक्त सत्रामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थापन क्षेत्रातील बदलते प्रवाह समजून घेता आले आणि जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन लाभले.