पुणे – : फोनपेचा ‘पिनकोड’ हा हायपरलोकल क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म आता संपूर्ण पुण्यात सुरू झाला आहे. स्थानिक व्यवसायांशी थेट भागीदारी करत या ॲपच्या माध्यमातून पुणेकर आता नव्या पद्धतीने खरेदी करू लागले आहेत. पारंपरिक क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स डार्क स्टोअर्सवर (अशी गोदामे, जिथे ग्राहकांना प्रत्यक्ष खरेदी करता येत नाही, फक्त ऑनलाइन ऑर्डरसाठीच तिथून माल वितरित केला जातो.) अवलंबून असतात, तर पिनकोड ॲप त्या परिसरातील स्थानिक दुकानांमधून वस्तू घेऊन डिलिव्हरी करत ग्राहकांना १० मिनिटांत विश्वासार्ह मार्केटशी जोडते. या पद्धतीमुळे ग्राहकांना दर्जेदार उत्पादनांमधून निवड करता येते आणि स्थानिक व्यवसायांना डिजिटल अर्थव्यवस्थेत वाढण्याची संधी मिळते.
पुण्यात भक्कम रिटेलर नेटवर्क असल्यामुळे पिनकोड ॲप किराणा, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, वेलनेस, औषधे, पाळीव प्राण्यांची देखभाल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू अशा अनेक श्रेणींमध्ये सर्वाधिक उत्पादन पर्याय उपलब्ध करून देते. बाणेर, मगरपट्टा आणि कॅम्प-कोंढवा यांसारख्या प्रमुख भागांतील ग्राहक आता दोराबजीज, वेलनेस फॉरएव्हर, नेचर्स बास्केट, चिकन-विकन (बारामती अॅग्रो) आणि चॅम्पियन स्पोर्ट्स यांसारख्या आघाडीच्या स्थानिक दुकानांतून खरेदी करून केवळ १० – १५ मिनिटांत जलद डिलिव्हरी प्राप्त करू शकतात.

पिनकोडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक लोहचेब म्हणाले की “ग्राहकांसाठी पिनकोड ॲप म्हणजे त्यांच्या परिचयाच्या स्थानिक बाजारात जणू ऑनलाइन भेट देण्यासारखं आहे. किराणा माल असो, औषधे असोत वा दैनंदिन गरजेच्या इतर वस्तू असोत, या सर्व वस्तू वेगवेगळ्या दुकानांतून खरेदी करण्याचा अनुभव पिनकोडच्या माध्यमातून एकाच ठिकाणी मिळतो. पारंपरिक क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स डार्क स्टोअर्सवर अवलंबून असतात, तर आमचे मॉडेल स्थानिक व्यवसायांना वाढण्याची संधी देते आणि ग्राहकांसाठी अतुलनीय सोयीसुद्धा निर्माण करते. पुण्यातील सक्रिय रिटेल मार्केटमुळे आम्ही मजबूत नेटवर्क उभारू शकलो.
शहरभर झालेल्या या विस्तारीकरणाचा आनंद साजरा करण्यासाठी पिनकोड ॲपतर्फे विविध कॅटेगरींमध्ये एक्सक्लुझिव्ह डिस्काउंट देण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यातील वेगवान व विश्वासार्ह हायपरलोकल खरेदीसाठी हा एक पसंतीचा प्लॅटफॉर्म झाला आहे. ग्राहकांना त्यांच्या ऑर्डरवर खास डिस्काउंट्स आणि मोफत डिलिव्हरीचा (₹89 वरील ऑर्डरची मोफत डिलिव्हरी) लाभ घेऊ शकतात. स्थानिक दुकानांशी असलेली जोडणी आणि उत्पादनांची अतुलनीय पर्याय उपलब्धता यामुळे हायपरलोकल खरेदीमध्ये पिनकोड नवा मापदंड निर्माण करत आहे.