- आयआयएससी, बंगळुरूतील मार्गदर्शकांकडून शैक्षणिक नेतृत्व
पुणे, : अवजड उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने एफएसआयडीच्या वतीने सीओईपी तांत्रिक विद्यापीठामध्ये समृद्धी या तीन दिवसीय रोटेटिंग मशिनरी बूटकॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम तसेच अंतिमपूर्व (प्री-फायनल) वर्षाच्या विद्यार्थ्यांना रोटेटिंग मशिनरीमधील (टर्बाईन्स, कॉम्प्रेसर्स आणि पम्प्स) व्यावहारिक व उद्योगाशी सुसंगत ज्ञानाने सुसज्ज करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
या बूटकॅम्पमध्ये रोटेटिंग मशिनरीची रचना, कार्य आणि समस्येचे निदान याची सखोल माहिती देण्यात आली. व्हायब्रेशन अॅनालिसिस, डायनामिक बॅलॅन्सिंग आणि सिस्टिम मॉनिटरिंग अशा प्रगत विषयांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. प्रत्यक्ष जगातील यांत्रिक कामाच्या सिम्युलेशन करणाऱ्या 3डी संवादात्मक व्हिज्युअलाईजेशनची त्याला भर देण्यात आली. औद्योगिक वस्तूंचे इंटरनेट (इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्ज – आयआयओटी) आणि डिजिटल ट्विन तंत्रज्ञान यांचा परिचय हे त्याचे मुख्य आकर्षण ठरले. आधुनिक औद्योगिक वातावरणात स्मार्ट सिस्टिम्समुळे यंत्रांच्या समस्यांचे निदान, कामगिरी आणि भविष्यात्मक देखभाल यांना नवा आकार कसा मिळत आहे, याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
एफएसआयडीचे प्रॉडक्ट अॅक्सिलरेशनचे संचालक योगेश पंडित म्हणाले, “हा बूटकॅम्प ‘प्रवृद्धी’ या व्यापक अखिल भारतीय प्रॉडक्ट अॅक्सिलेरेटर कार्यक्रमाचा भाग आहे. आयआयएससीच्या शैक्षणिक मार्गदर्शनाखाली प्रगत उत्पादन प्रणाली आणि यांत्रिकी अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य या प्रशिक्षण उपक्रमात बाळगण्यात आले आहे. झपाट्याने बदलणाऱ्या उत्पादन क्षेत्रामध्ये भारतातील अभियांत्रिकी पदवीधर हे नेतृत्व करण्यास सक्षम होतील, या दृष्टीने व्हीआर, आयआयओटी आणि क्षेत्रकेंद्रीत मार्गदर्शन यांसारख्या इमर्सिव्ह शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे.
सीओईपी टेक युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रो. सुनील भिरुड, सीओईपी टेकचे मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रमुख प्रो. नागेश चौगुले आणि बूटकॅम्पच्या सुविधेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) मुंबईचे डॉ. विकास फल्ले यांनी विशेष प्रयत्न केले.