इंदोर, – रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) हा भारतातील रिटेल क्षेत्रातील राष्ट्रीय व्यापार संघ आहे.सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस आणि रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) चे प्रतिनिधित्व करणारे लॉरेन्स फर्नांडिस, डायरेक्टर रिटेल लर्निंग आणि मेंबर रिलेशनशिप, तसेच रिया फॅशन इंदोरचे संस्थापक रुपेश जैन आणि ज्योती यांच्या सह एक सामंजस्य करार (MoUs) करण्यात आला. हा समारंभ स्कूल ऑफ रिटेलच्या सततच्या सहकार्य आणि नवोपक्रमाच्या दृष्टीकोनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा करार दोन संस्थांमधील एकत्रित दृष्टीकोनाला अधोरेखित करतो. सामंजस्य कराराचा उद्देश भारतातील रिटेल उद्योगाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणे हा आहे.
“हे करार शैक्षणिक, संशोधन, इंटर्नशिप आणि नवोपक्रमासाठी एक सहकार्यात्मक गोष्टी तयार करण्याचा उद्देश ठेवत आहे , ज्यामुळे अकादमी आणि उद्योग यामधील अंतर कमी होईल. ही भागीदारी सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेसच्या विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी प्रमुख रिटेल संस्थांसोबत संलग्न होण्यासाठी एक मोठं व्यासपीठ प्रदान करते. या सहकार्यांतर्गत इंटर्नशिप आणि प्लेसमेंट संधी, रिटेल लॅब्सच्या विकासासाठी, गेस्ट सत्रे, सेमिनार्स आणि इतर गोष्टींचा समावेश असेल.” – प्रो. विनिथ कुमार नायर, व्हाईस चॅन्सलर, सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस